शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाला ठोकले कुलूप

By admin | Updated: February 23, 2016 00:07 IST

अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर आयुक्त पदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी,...

अधिकारी, कर्मचारी अडकले : आदिवासी विकास परिषदेचे आंदोलन अमरावती : अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर आयुक्त पदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदीस्त करून कायम स्वरुपी एटीसीची मागणी रेटून धरली. या आंदोलनाने एकच खळबळ उडाली होती. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी तत्काळ या आंदोलनाची दखल घेऊन एटीसी कार्यालय गाठले. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. तब्बल १४ जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाला कायम स्वरुपी एटीसी मिळाले नाही. आंदोलनकर्त्यांच्या मते दोन वर्षांपासून हे पद लालफीतशाहीत अडकले असून अप्पर आयुक्त पदावर आदिवासी समाजाची जाणीव असलेल्या अनुभवी व तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी अखिल भारतीय आदीवासी विकास परिषदेचे विदर्भ अध्यक्ष विलास वाघमारे यांच्या नेत्तृत्वात करण्यात आली. तत्पूर्वी आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त नितीन तायडे यांना निवेदन सोपविले. मात्र, त्यांच्या आश्वासनाने समाधान न झाल्याने आंदोलनात्मक पावित्रा घेतला. कर्मचारी व अधिकाऱ्यांना कार्यालयाच्या आत बंदिस्त करून कार्यालयाला कुलूप ठोकल्याने एकच गोंधळ उडाला. एटीसी कार्यालयाला कुलूप ठोकल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. मात्र, आंदोलनकर्ते कुलूप लावून तेथून पसार झाले होते. उपायुक्तांच्या उपस्थितीत कार्यालयाचे कुलूप उघडल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटकेचा निश्वास सोडला. या आंदोलनाबाबत उपआयुक्त तायडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून ते पोलीस तक्रार करणार होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस तक्रार दाखल केली नव्हती.