शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या खरेदी केंद्राला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:44 IST

स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीत गत आठवड्यापासून मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचा माल खरेदीस नकार : काँग्रेस नेते संतप्त, अधिकाºयांनाही डांबले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीत गत आठवड्यापासून मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, विविध कारणे पुढे करीत शेतमालाला खरेदीस नकार दिल्याने प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रकाश साबळे यांच्या नेतृत्त्वात सोमवारी खरेदी केंद्राला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. दरम्यान जिल्ह्यातील नाफेडमार्फत सुरू असलेल्या खरेदी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीनची सरसकट खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.यावर्षी अतिवृष्टीने जिल्हाभरात मूग, उडीद, सोयाबीन व त्यापाठोपाठ कपाशीचेही नुकसान झाले. सोयाबीनचेही पीक हातून गेली. मात्र अशा स्थितीत काही शेतकºयांनी मूग-उडीद विक्रीसाठी आणले असता नाफेडने सुरू केलेल्या खरेदी केंद्रांवर शेतमालास गुणवत्ता नाही, माल ओला आहे, कीड आदी कारणे पुढे करून अधिकाºयांनी ते खरेदी करण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शेतकºयांची व्यथा लक्षात घेत काँग्रेसने बाजार समितीमधील नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्राला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. याचवेळी संबंधित अधिकाºयांना याचा जाब विचारून त्यांना कार्यालयातच डांबून ठेवले. वातावरण तापल्याने अखेर अधिकारी बाहेर निघाले. मात्र खरेदी केंद्राचे टाळे कायम होते. हा प्रकार काँग्रेसचे नेते प्रकाश साबळे यांनी जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिला. मूग, उडीद, सोयाबीनची शासकीय खरेदीची मागणी त्यांनी रेटून धरली. यावेळी बाजारसमितीचे सभापती प्रफुल्ल राऊत, समीर जवंजाळ व शेतकरी उपस्थित होते.