शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:01 IST

नवीन वर्षात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.  आतापर्यंत संक्रमितांची नोंद २९ हजार ३५७ झाली असून, ४६३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्याची भीती बाळगण्याऐवजी नागरिक बिनधास्त आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी आता सर्वाधिक प्रभावित अमरावती महापलिका व अचलपूर नगर परिषद हद्दीत २२ फेब्रुवारीच्या रात्री ८ पासून १ मार्च रोजी सकाळी ६ पर्यंत लॉकडाऊन राहील, असे पालकमंत्र्यांनी घोषित केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची घोषणा, अमरावती महापालिका, अचलपूर नगरपालिका हद्दीत लागू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाग्रस्तांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूचा वाढता आलेख बघता, कोरोना नियंत्रणासाठी २२ फेब्रुवारीला रात्री ८ पासून आठवडाभर अमरावती महापालिका व अचलपूर नगर परिषद हद्दीत लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे केली. जीवनावश्यक वस्तू यातून वगळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन वर्षात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.  आतापर्यंत संक्रमितांची नोंद २९ हजार ३५७ झाली असून, ४६३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्याची भीती बाळगण्याऐवजी नागरिक बिनधास्त आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी आता सर्वाधिक प्रभावित अमरावती महापलिका व अचलपूर नगर परिषद हद्दीत २२ फेब्रुवारीच्या रात्री ८ पासून १ मार्च रोजी सकाळी ६ पर्यंत लॉकडाऊन राहील, असे पालकमंत्र्यांनी घोषित केले. मात्र, जीवनावश्यक वस्तू, किराणा, औषधी, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील. अमरावती व अचलपूर एमआयडीसीत ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याची यापूर्वी परवानगी दिली, ते सर्व उद्योगधंदे सुरू असतील.  आठवड्याचे लॉकडाऊन घोषित झाले असून, नागरिकांनी कोरोना नियमावलींचे पालन न केल्यास यात पुन्हा वाढ होऊ शकते, असे संकेत पालकमंत्री ठाकूर यांनी दिले. 

आठवडी बाजार भरण्यास मनाईमहापालिका क्षेत्रात, अचलपूर नगर परिषद हद्दीतील सर्व प्रकारच्या आठवडी बाजार भरण्यास लॉकडाऊनच्या काळात मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याYashomati Thakurयशोमती ठाकूर