फोटो - खोपे २१ एस
आठवडी बाजार नसल्याने ग्राहक नाही, ग्रामीण भागात घागर विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ
गजानन खोपे - वाठोडा शुक्लेश्वर : गरीब व मध्यमवर्गीय जनतेला कमी दरात थंड पाण्याची सोय देणाऱ्या घागर (माठ) या वस्तूला यावर्षी लॉकडाऊनमुळे बाजारात मागणी कमी आहे. आठवडी बाजारही बंद करण्यात आले आहेत. त्याचा फटका ग्रामीण भागात घागर निर्मिती करणाऱ्या कुंभार बांधवांवर आली आहे. त्यांचे हंगामातील अर्थकारण ठप्प झाले आहे.
उन्हाळ्यात घागरची मागणी जास्त असते. त्यामुळे हीच वेळ कुंभार बांधवांसाठी आर्थिक मिळकतीची असते. दरवर्षी उन्हाळ्यात घागर व्यावसायिक जवळपासच्या ग्रामीण भागातील आठवडी बाजारात जाऊन घागरी विकतात. यातूनच ते त्यांच्या कुटुंबाच्या पालनपोषणाकरिता मिळकत होते. परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार नाहीत आणि घागर घेऊन जाण्याकरिता वाहनाची अडचणी येत असल्याने घागर व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजबांधवांना मोठा फटका बसला आहे.
लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. परिणामी घागर व्यवसायावर मंदीचे सावट आहे, तर घरातील गरजा भागिवताना या समाजबांधवांवर कर्जाचा डोंगर उभा होणार आहे.
-------------------
यावर्षी लॉकडाऊनमुळे अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. वाहतूक समस्या आहे. आठवडी बाजार बंद असल्यामुळे घागर खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत फार मोठी घट झाली. त्यामुळे यंदा आर्थिक गणिते जुळणार नाहीत, हे नक्की
००००००००००००, ०००००००००००------------------
नाव घ्यायचे आहे.