शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

११५ बचत गटांना तीन कोटींचे कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 5:00 AM

महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने श्री.शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषक भवन येथे माविमच्या रोजगार निर्मिती योजनेंतर्गत आयोजित विविध उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. ना. ठाकूर यांच्या हस्ते महिला स्वयंसहायता बचत गटांना भाजीपाला विक्री ई-कार्ट रिक्षा आणि महिला बचत गटांना कर्ज वितरित करण्यात आले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते ई-कार्ट रिक्षा, कृषी अवजारे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  नवतेजस्विनी योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण व अत्याधुनिक व्यवसायांचे प्रशिक्षण महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ११५  गटांना ३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. त्यामुळे महिलांमध्ये असलेली उद्योगप्रियता लक्षात येते. सर्व स्तरातील महिलांचा त्यांच्या बचत गटात सक्रिय सहभाग असावा. अल्पसंख्यांक महिलांनीदेखील बचतगट तयार करून विकास साधावा, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने श्री.शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषक भवन येथे माविमच्या रोजगार निर्मिती योजनेंतर्गत आयोजित विविध उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. ना. ठाकूर यांच्या हस्ते महिला स्वयंसहायता बचत गटांना भाजीपाला विक्री ई-कार्ट रिक्षा आणि महिला बचत गटांना कर्ज वितरित करण्यात आले. तसेच माविमने कोरोनाकाळात महिलांना स्वयंरोजगार प्रदान केला, त्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला माविमच्या मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुहास बोबडे, मानव विकास मिशनचे औरंगाबादचे माजी उपायुक्त रुपचंद राठोड, माविमचे निवृत्त जिल्हा समन्वय अधिकारी खुशाल राठोड, माविमच्या जिल्हा सनियंत्रण अधिकारी मीनाक्षी शेंडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन अचलपूरच्या सोनाली पुंडकर यांनी तर आभार माविमचे समन्वय अधिकारी ऋषिकेश घयार यांनी केले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटांना धनादेशपालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते जिल्हयातील ११५ गटांना २ कोटी ९१  लक्ष रुपये कर्ज वितरीत करण्यात आले. तर वैयक्तिकरित्या तीन बचत गटांना म्हणजेच लोणी येथील आम्रपाली स्वयंसहायता बचत गटाला ७ लक्ष ५० हजार रुपये, अचलपूर येथील आशिर्वाद तर दर्यापूर येथील दुर्गा स्वयंसहायता बचत गटाला प्रत्येकी  ७ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. हाथीपुरा येथील अल्पसंख्यांक महिलांचा मोहम्मद झियान यांच्या गटाला व करीमपुरा येथील सरोज बचत गटाला प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

आशासेविकांचा सन्मानकोरोनाकाळात उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या आशा सेविकांना पालकमंत्री ठाकूर यांनी मास्क वाटप करुन सन्मानित केले. सुनीता खराटे, वैशाली गेडाम, रेखा पवार व पूजा ढोके यांना सन्मानित केले. 

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर