शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या दोन काळविटांना जीवदान

By admin | Updated: April 6, 2015 00:29 IST

मंगळवारी रात्री पाण्याच्या शोधात निघालेले दोन मोठे काळवीट विहिरीत पडले.

वनकर्मचाऱ्यांचे प्रयत्न : अंबाडा शेतशिवारातील घटनाअचलपूर : मंगळवारी रात्री पाण्याच्या शोधात निघालेले दोन मोठे काळवीट विहिरीत पडले. वन कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी अथक प्रयत्न करून बुधवारी दुपारी या दोन्ही काळविटांना सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडले. तालुक्यातील अंबाडा (कंडारी) येथील राजेश श्रीराम वाडोकार यांच्या शेतात ही घटना घडली. परतवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तळेगाव मोहना बिटमध्ये अंबाडा कंडारी या परिक्षेत्राचा समावेश आहे. बहिरमसह मेळघाटचे जंगल लागून आहे. उन्हाळा असल्याने हिरवा चारा व पाण्याच्या शोधात हे तृणभक्षी व मांसभक्षी प्राणी शहराकडे भटकतात. दोन्ही काळवीटदेखील अन्न व पाण्याच्या शोधात निघाले असतानाच विहिरीत पडल्याचा कयास व्यक्त होत आहे. ही बाब बुधवारी सकाळी शेतमालक वाडोकार यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच वनकर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पटगव्हाणकर, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक आठवले, वनरक्षक प्रमोद बरडे, सईद भोवाली, अशोक कराळे आदींनी बुधवारी दुपारी १२.३० वाजता दोराच्या सहाय्याने काळविटांना बाहेर काढले व जंगलात सुखरूप सोडले. शिकारीची शक्यता परिसरात शिकाऱ्यांनी या काळविटांना हाकलून गावाकडे आणले असावे, अशी शक्यता वर्तविली जात असून वनकर्मचारी तसा तपास करीत आहेत. हरिण व काळवीट बहिरम रस्त्यावर हमखास दिसतात. दोन महिन्यांपूर्वी एका अपघातात हरणाचा मृत्यू झाला होता, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)मेळघाटचे व परतवाडा परिक्षेत्राचे जंगल लागून असल्याने रात्रीला तृणभक्षी प्राणी चाऱ्याच्या शोधार्थ येतात. त्यामध्ये हा अपघात झाला. काळविटांना जिवंत बाहेर काढून सुखरूप जंगलात सोडण्यात आले. -हरिश्चंद्र वरगव्हाणकर,वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा.