शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंह तारकासमूहात होणार उल्कावर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:32 IST

अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करताना अचानक एखादी प्रकाशरेखा आकाशात लखलखताना दिसते अन् क्षणात गायब होते. हा उल्का वर्षावाचा प्रकार आहे. १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान सिंह तारकासमूहात मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. हा उल्का वर्षाव अवलोकण्याची पर्वणी आहे.

ठळक मुद्देआकाशात चार दिवस दिवाळी : १७ ते २० पर्यंत अवलोकनाची पर्वणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करताना अचानक एखादी प्रकाशरेखा आकाशात लखलखताना दिसते अन् क्षणात गायब होते. हा उल्का वर्षावाचा प्रकार आहे. १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान सिंह तारकासमूहात मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. हा उल्का वर्षाव अवलोकण्याची पर्वणी आहे.या उल्का वर्षावाचे ‘लिओनिड्स’ असे नाव आहे. आपल्याकडे याला तारा तुटणे म्हणतात. मात्र, तारा हा कधी तुटत नसतो. तो उल्का वर्षावाचा प्रकार आहे. याची वेळ व तारीख निश्चित नसते. त्यामुळे निरीक्षणाची तयारी असणाºयांनीच उल्का वर्षाव पाहण्याचा प्रयत्न करावा. घराबाहेत पडलो अन् भराभर उल्का पडताना दिसल्या, अशा अवास्तव कल्पना करू नये. उल्कांचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणाच्या शास्त्रीय नोंदी, याची खगोल जगतात खूप गरजेचे आहे.ज्यावेळी एखादी उल्का आपल्याला पडताना दिसते. या संदर्भात लोकांच्या खूप अंधश्रद्धा आहे. परंतू, अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कुठेच आधार नाही. सिंह तारकासमूहातून होणारा हा उल्का वर्षाव ‘टेम्पटटल’ या धुमकेतूच्या अवशेषांमुळे होतो. हा धूमकेतू ३३ वर्षांनी सूर्याला भेट देतो. हा उल्का वर्षाव अगदी साध्या डोळ्यांनी आपल्याला मध्यरात्रीनंतर घराच्या गच्चीवरून किंवा अंधारातून पाहता येतो. सर्व खगोलप्रमींनी व जिज्ञासूंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर, प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.पृथ्वीवर येते ती ‘अशणी’धूमकेतू पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असताना त्यातील काही भाग मोकळा होतो. हे त्याने मागे टाकलेले अवशेष असतात. या उल्का एखाद्या तारकासमूहात येत आहेत, असे वाटते. तासाला ६० किंवा त्याहून अधिक उल्का आकाशातील एखाद्या भागातून पडत असतील तर त्यास ‘उल्का वर्षाव’ म्हणतात. काही वेळा गतिमान उल्का पृथ्वीच्या वातावरणातून खाली येताना त्या घनरूप अवस्थेत पृथ्वीवर येतात. तेव्हा त्यास ‘अशणी’ असे म्हणतात. उल्काशास्त्रात याला महत्त्वाचे स्थान आहे. बाह्य अवकाशातील वस्तूंचे नमुने या अशणीमुळेच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्या जडणघडणीचा अर्थ आपल्याला लावता येतो.