अप्रतिम : आकाशात चार दिवस दिवाळी, सचिन सुंदरकर -अमरावती१७ ते २० नोव्हेंबर या काळात सिंह राशीतून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. या उल्का वर्षावाचे लिओनिड्स हे प्रसिध्द नाव आहे. अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करताना क्षणार्धात एखादी रेषा चमकून जाताना दिसते. या घटनेला तारा तुटला असे म्हटले जाते. खरे पाहता ही प्रकाश रेषा दुसऱ्या ताऱ्याची नसते. ती एक आकाशात घडणारी खगोलीय घटना आहे. तारा कधीही तुटत नसतो. या घटनेला उल्कावर्षाव असे म्हणतात. १७, १८ व १९ नोव्हेंबरच्या पहाटे उल्कावर्षावाची शक्यता अधिक राहील. उल्कावर्षावाची तीव्रता निश्चित तारीख व वेळ या गोष्टी खात्रीने सांगता येत नाही. निरीक्षणाची तयारी आणि सोशिकता असलेल्यांनीच उल्का पाहण्याचा प्रयत्न करावा. पडले घराबाहेर आणि भराभर उल्का पडताना दिसले अशी अवास्तव कल्पना करुन घेऊ नये. उल्कांचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणाच्या शास्त्रीय नोंदी याची खगोल जगतात खूप गरज आहे.धूमकेतू सूर्याला प्रदक्षिणा घालताना त्यातील काही भाग मोकळा होतो. हे धूमकेतूने मागे टाकलेले अवशेष होय. या उल्का एखाद्या तारका समूहातून येतात, असे वाटते. तासाला ६० किंवा त्याहून अधिक उल्का आकाशातून पडत असतील तर त्यास उल्कावर्षाव असे म्हणतात. काही वेळा उल्का खाली येताना त्या घनरुप अवस्थेत पृथ्वीवर पडतात. तेव्हा त्यास 'अशणी' असे म्हणतात. बाह्य अवकाशातील वस्तूंचे नमुने या अशणीमुळे आपणास मिळतात. त्यामुळे वस्तूच्या जडणघडणीचा अर्थ आपणास लावता येतो.ज्यावेळी एखादी उल्का आपणास पडताना दिसते. त्यासंदर्भात लोकांच्या अंधश्रद्धा खूप आहे. परंतु याला खगोलशास्त्रात कोठेही आधार नाही. सिंह राशीतून होणारा हा उल्कावर्षाव टेम्पलटटल या धूमकेतूच्या अवशेषामुळे होतो. हा धूमकेतू ३३ वर्षांनी सूर्याला भेट देतो.
सिंह राशीतून होणार चार दिवस उल्का वर्षाव
By admin | Updated: November 2, 2014 22:22 IST