महापालिकेच्या छत्री तलाव परिसरात नयनरम्य कमळ फुलल्याने या परिसरात सौंदर्य फुलले आहे. पर्यटक म्हणून येणार्यांचे हे कमळ आकर्षणही ठरु लागले आहे. तलावात कमळ फुलल्याने ते बघण्यासाठी अनेकांचा ओढा त्या दिशेने वळत असल्याचे दिसून येते. कमळ फुलासोबत तलावात विविध पक्ष्यांचे थवे हेदेखील लक्ष वेधून घेत आहेत.