शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाप्रमाणे सोयाबीन, कपाशीलाही राजाश्रय द्या- रविकांत तुपकर

By उज्वल भालेकर | Updated: October 26, 2023 19:07 IST

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी १ नोव्हेंबरपासून निघणार एल्गार रथ यात्रा

उज्वल भालेकर, अमरावती: राज्यात ज्या प्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय आहे, त्याप्रमाणे सोयाबीन, कपाशीचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही राजाश्रय मिळायला हवे. उसाच्या संदर्भात ज्या प्रकारे नेते आवाज उठवतात. त्याप्रमाणे सोयाबीन, कपाशीच्या प्रश्नावर एकही नेता आवाज उठवत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार महामोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.पावसाच्या खंडामुळे सोयाबीनवर यलो मोझॅकचा अटॅक, तर कपाशीवर बोंडअळी मुळे यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट आहे; परंतु यावर कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून शेगाव येथून गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन एल्गार रथ यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरला ही रथ यात्रा बुलढाणा येथे पोहोचून या रथयात्रा एल्गार महामोर्चात त्याचे रूपांतर होणार असून विदर्भातील लाखोच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी असणार असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली. या महामोर्चातून पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत, सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार, तर कपाशीला १२ हजार ५०० भाव, चालू वर्षाची पीक विम्याची अग्रीम व शंभर टक्के पीक विमा लाभ, विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती, वन्यप्राण्याच्या त्रासापासून शेतकऱ्यांना सिमेंटचे मजबूत कम्पाउंड, अशा विविध मागण्या करण्यात येणार आहे. या महामोर्चामध्ये पक्षांचे झेंडे बाजूला सारून शेतकरी सहभागी होणारा असल्याचेही तुपकर म्हणाले. यावेळी प्रशांत अढाऊ, कपिल पडघान, प्रशांत शिरभाते, दिनेश यावले, प्रीती साहू आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती