शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

विजेच्या धक्क्याने पिल्लू दगावले : वाचविण्यासाठी माकडिणीची धडपड

By admin | Updated: February 16, 2015 00:27 IST

मातृत्वाचे वरदान मनुष्य प्राण्यांप्रमाणेच पशुंनाही लाभले आहे. मनुष्याला शब्दांतून ममत्वाची प्रचिती देता येते. पशु मात्र प्रत्यक्ष कृतीतून ही भावना व्यक्त करतात.

नरेंद्र जावरे अचलपूरमातृत्वाचे वरदान मनुष्य प्राण्यांप्रमाणेच पशुंनाही लाभले आहे. मनुष्याला शब्दांतून ममत्वाची प्रचिती देता येते. पशु मात्र प्रत्यक्ष कृतीतून ही भावना व्यक्त करतात. अशीच एक घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या आपल्या चिमुकल्या पिल्लाला वाचविण्याकरिता एका माकडीणीने केलेली केविलवाणी धडपड आणि पिल्लाच्या मृत्यूनंतर झालेली तिची तगमग पाहून ते दृश्य पाहणाऱ्यांचे डोळेही नकळत पाणावले. रविवार म्हणजे सुटीचा दिवस. सकाळी ११.३० वाजताची वेळ. परतवाडा शहराच्या मध्यभागी असलेल्या छोटा बाजार परिसरातील गवळीपुरा परिसरात माकडांचा एक कळप इकडून तिकडे हुंदडत होता. त्या कळपात एक लेकुरवाळी माकडीणही होती. क्षणात तिचे पिल्लू तिला बिलगे तर क्षणात या झाडाच्या फांदीवरून त्या झाडावर जाई. माकडीण मात्र आपल्या पिल्लासाठी जेवण शोधण्यात व्यस्त होती. एखाद्या घरात शिरून काही तरी शोधण्याच्या प्रयत्नात तिने उंच उडी घेतली. अन् माकडिणीचा आकांतअचलपूर : पिल्लानेही तिच्या पाठोपाठ असाच प्रयत्न केला. परंतु त्याचे उड्डाण कमी पडले अन् ते पिल्लू डीबीवरील जिवंत विद्युत तारेला जाऊन धडकले. विजेच्या धक्क्याने क्षणात त्याचा मृत्यू झाला. विद्युत तारांना चिकटलेले पिल्लू पाहताच माकडीणीने आकांत सुरू केला. पोटच्या गोळ्याला वाचविण्याची तिची धडपड बघणाऱ्यांच्या हृदयाला हात घालणारी होती. पिल्लाला वाचविण्याकरिता माकडीणीने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्याला तोंडाद्वारे श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्नही करीत होती. मात्र, तिचे प्रयत्न निष्फळ ठरले. पिल्लाला वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्देवी माता गंभीर जखमी झाली. एका मूक मातेचा आकांत पाहून परिसरातील काही सहृदयी युवकांनी त्या पिल्लाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिल्लाच्या मृत्यूने चवताळलेली माकडीण आक्रमक झाली होती. हा आकांत पाहून बघ्यांनाही गहिवरले. क्रिकेट सामना ठरला अडसरडीबीमधील जिवंत विद्युततारांचा स्पर्श झाल्याने माकडाच्या पिल्लाचा मृत्यू झाल्यानंतर माकडीणीला वाचविण्याच्या उद्देशाने परिसरातील बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी विद्युत वितरण कंपनीसोबत संपर्क साधून वीज पुरवठा खंडित करण्याची मागणी केली. मात्र, विश्वचषकातील भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना सुरू असल्याने वीज खंडित केली गेली नाही. शेवटी बजरंग दल कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लाकडी काठीने मृत पिल्लाला खाली पाडले. कर्मचाऱ्यांनी पुढील कारवाई केली. आतापर्यंत या डीबीवर विजेच्या झटक्याने ५५ ते ६० माकडांचा मृत्यू झाला आहे. ही धोकादायक डीबी हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली. परंतु वीज वितरण कंपनीने अद्याप दखल घेतलेली नाही. - राधाकिसन नंदवंशी,नागरिक, छोटा बाजार, परतवाडा.पिल्लाचा जीव वाचविण्यासाठी माकडीणीने केलेला प्रयत्न बघ्यांना गहिवरून सोडणारे होते. माकडांच्या जीवावर उठलेली ही डीबी हटविण्यात यावी. - मोनू इर्शिद,सामाजिक कार्यकर्ता, परतवाडा.