शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘सौभाग्य’तून १४ गावांत प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:20 IST

महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्यावतीने ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सौभाग्य योजनेतून ४४५ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील २५ पैकी १४ नवबौद्ध, अनुसूचित जाती घटकांच्या वस्त्यांचे १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे.

ठळक मुद्देमहावितरण : 'एससी' वस्त्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्यावतीने ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सौभाग्य योजनेतून ४४५ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील २५ पैकी १४ नवबौद्ध, अनुसूचित जाती घटकांच्या वस्त्यांचे १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे.यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुलआमला, बेलोरा हिरापूर, सारसी, पिंपळगाव निपाणी, चांदूर रेल्वे तालुक्यातील कळंबगाव, निंभा दर्यापूर तालुक्यातील शिवर (खु.), धामोडी, रामतीर्थ, शिवर (बु.), नलवडा आदी गावांचा, तर अमरावती तालुक्यातील कापूस तळणी, पिंपरी आणि भातकुली तालुक्यातील निंभा, गावाचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, म्हणजेच सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट्य आहे. ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलपासून राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वराज्य अभियानात जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातील १४ 'एससी' वस्त्यांमध्ये शंभर टक्के वीजजोडणी देण्यात आल्याने गोरगरीब कुटुंबे प्रकाशात आली आहेत.प्रत्येक गावात विशेष मेळावाज्या गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक 'एससी'वस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा गावांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यासाठी महावितरण अमरावती परिमंडळाच्या वतीने प्रत्येक गावात विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले व लाभार्थ्यांना तत्काळ वीजजोडणी देऊन १४ ते २२ एप्रिल या आठ दिवसांत जिल्ह्यातील १४ नवबौद्ध, अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये विद्युतीकरण करण्यात आले आहे.