शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

९० फूट उंचीवर मांजात अडकलेल्या घारीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:34 IST

नायलॉन मांजात अडकलेल्या घारीला ९० फूट उंचीवरून खाली उतरवून वसा संस्थेने जीवनदान दिले. राजापेठ पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या एका पिंपळाच्या झाडावर ही घार मरणाशी झुंज देत होती.

ठळक मुद्देतीन तास चालले रेस्क्यू आॅपरेशन : वसा संस्थेचे पक्षीप्रेम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नायलॉन मांजात अडकलेल्या घारीला ९० फूट उंचीवरून खाली उतरवून वसा संस्थेने जीवनदान दिले. राजापेठ पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या एका पिंपळाच्या झाडावर ही घार मरणाशी झुंज देत होती. पक्षिप्रेमींनी जिवाची पर्वा न करता तीन तास अथक परिश्रम घेऊन तिची झुंज यशस्वी केली.पिंपळाच्या सर्वात वरच्या टोकावर मांज्यात एक घार अडकून तडफडत असल्याचे वसा संस्थेच्या काही सदस्यांच्या लक्षात आले होते. या पक्ष्याचे प्राण कसे वाचवावे, यासाठी मंथन झाल्यानंतर वसा संस्थेने अग्निशमन दलाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. वसा समूह व अग्निशमन दलाचे जवान गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचले. अग्निशमनजवळील शिडीने पक्षिपे्रमी पिंपळाच्या झाडावर चढले. त्यांतर दोरखंडाचा वापर करून ते घारीपर्यंत पोहोचले. तिला अलगद मांज्यातून सोडविल्यानंतर उपचार सुरू झाले.पंखात मांजा अडकल्याने घार जखमी झाली होती. तब्बल तीन तास हे रेस्क्यू आॅपरेशन चालले. वसा संस्थेचे पदाधिकारी संकटात सापडलेल्या पक्ष्यांवर लक्ष ठेवूनच असतात. वर्षभरात २० ते २५ पक्ष्यांवर उपचार केले जातात. मकर संक्रांतीच्या काळात पंतगी उडविण्याचे प्रकार चालतात. अशाप्रसंगी पंतगीच्या मांज्यात अडकून अनेक पक्षी जखमी होतात. त्यावेळी वसाचे पक्षिप्रेमी लगेच घेऊन जातात. नायलॉन मांजा पक्षासोबत मानवालाही धोका ठरत आहे. अनेकदा मांजात अडकून नागरिक जखमी सुध्दा झाले आहेत. गुरुवारी झाडावरील मांजात अडकलेल्या घारीला वाचविण्यासाठी वसाचे अवी पुंजलवाल, सूरज डोळस, गणेश अकर्ते, ज्ञानेश्वर पात्रोकर, शुभम सायंके, अग्निशमनचे अमित ददगाळ, अतुल कपले, राजेश गजबे, फायरमन चालक नितीन इंगोले यांनी अथक परिश्रम घेतले. नॉयलॉनच्या मांजावर बंदी असताना शहरात छुप्या मार्गाने आजही या मांजाची विक्री सुरू आहे. हा मांजा जीवघेणा ठरत असून मांजा विक्री, उत्पादन किंवा साठवण करणे गुन्हा ठरते. पोलीस विभागाकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी पक्षिप्रेमींकडून होत आहे.