आॅनलाईन लोकमतअमरावती : नागाचा दंशच नव्हे, तर फुत्कारही काळजाचा ठोका चुकवतो. त्यात जोडी म्हटल्यानंतर तर काही सांगायलाच नको. मात्र, चांगापूर येथे नागाच्या एका जोडीला सर्पमित्रांनी परिश्रमपूर्वक पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले.चांगापूर येथील कॉटन मिलमध्ये नागाची जोडी रत असल्याची माहिती हेल्प फाऊंडेशनच्या सर्पमित्रांना कळविण्यात आली. क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्रांनी घटनास्थळ गाठले. सर्पमित्र शुभम गायकवाड, सुमेध गवई, श्रीकांत गावंडे, विक्की गावंडे यांनी सात ते आठ फुटांचे हे दोन्ही साप पकडण्यात यश मिळविले.सध्याचा काळ आक्रमकतेचा : नाग वा सापाच्या समागमाचा हा काळ असल्याने, बहुतांश ते जोडीने आढळतात. या काळात ते काहीच खात नाहीत. त्यामुळे ते खूप आक्रमक होतात. अशावेळी त्यांना हाताळले असता, चावा घेण्याची शक्यता जास्त असते. ही खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असे वानखडे म्हणाले.गैरसमजुती टाळासापाचा लाग दिसणे भाग्यकारक असते किंवा समागम चालू असताना त्यांना कोºया कपड्याने झाकल्यास त्या कापडात ठेवलेला पैसा वाढतच राहतो, या गोष्टीमध्ये तथ्य नसल्याचे हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे यांनी यानिमित्ताने सांगितले.
नागाच्या जोडीला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 22:51 IST