शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

याला जीवन ऐसे नाव!

By admin | Updated: February 15, 2016 00:51 IST

रोजगाराच्या शोधात मेळघाटातून अनेक मजूर कुटुंबासह अमरावतीत स्थलांतरित झालेत.

संदीप मानकर अमरावतीरोजगाराच्या शोधात मेळघाटातून अनेक मजूर कुटुंबासह अमरावतीत स्थलांतरित झालेत. शहरीकरणाच्या जीवनशैलीपासून व सुखसुविधेपासून कोसोदूर असलेले हे आदिवासी कुटुंब मिळेल तेथे निवारा शोधून जीवन जगत आहे. यालाच जीवन म्हणायचे का, असा प्रश्न स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम जरिदा, चुर्णी, काटपूर परिसरातील १० ते १५ कुटुंब राजापेठ परिसरातील इलेक्ट्रीकचे केबल टाकण्यासाठी दाखल झाले आहेत. वडाळीच्या बांबू केंद्राच्या गेटजवळ त्यांनी निवारा शोधला आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने चर्चा केली असता तात्पुरत्या पालाचे घर बांधलेले व तेथे राहत असलेले देवीदास अखंडे व संजू मावस्कर यांच्या घरात अठराविश्व दारिद्र्य असल्यानंतरही त्यांच्या बोलण्यात श्रीमंती जाणवत होती. भविष्याची चिंता नाही, गेलेल्या वेळेची फिकीर नाही. ते सांगतात बस २०० ते ३०० रुपये रोज कमवाला व दिवस भागला व पोटाची खळगी भरली की संपले जीवन. देवीदासला एक मुलगी दोन मुले, स्थलांतरित झाल्यामुळे शिक्षण, आरोग्याची सोय नाही. बाहेरुन पाणी आणावे लागते. ज्या ठिकाणी ते राहतात, तेथे सर्पदंश किंवा इतर प्राण्यांचा भय मनात नाही. चूल पेटवून दोन घास खाण्याचे व दोन्ही टाईम दिवसभर कामावर जायचे येथे पालाच्या घरात १५ कुटुंब असेच जीवन जगत आहेत. शासनाने शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी लाख प्रयत्न सुरू आहे. पण पदरी मात्र अपयशच! साहब, जंगल मे सोना है, इसमेही पुरी जिंदगी निकल गई. उपरवाला साथ मे है, असे स्मितहास्य देत, पोटासाठी जगावे लागते, असे म्हणतात. मेळघाटात शासनाच्या सुविधा मिळत नाही, रोजगारपण नाही, बँकेत खाते काढण्यासाठी चप्पल घासावी लागते. अशा हलाखीच्या परिस्थितीत गावाच्या बाहेर निसर्गरम्य वातावरणात एकांतवासाने हे जीवन जगत.