शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या मानेच्या करकोचाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:01 IST

त्या पक्ष्याचे घरटे, पक्षी आणि त्याची अंडी याची खात्री करून घेण्याकरिता ड्रोन कॅमेऱ्याने त्याचे निरीक्षण केले गेले. ड्रोन कॅमेऱ्याने निरीक्षण सुरू असताना त्या पक्ष्याने आपली अंडी वाचविण्याकरिता त्याने ती अंडी आपल्या पंखाखाली घेतली आणि अखेर ते सर्व बघून प्रशासन त्या पक्षाच्या बाजूने उभे राहिले. पक्षी आणि पक्ष्याची ती अंडी वाचविण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाबाबत जिल्हाभरातील पक्षिप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देझाडे तोडण्याचा निर्णय थांबविला : सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारले पालकत्व

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : भारतीय वन्यजीव कायद्याच्या शेड्यूल-४ अंतर्गत येत असलेल्या पांढºया मानेचा करकोचा पक्ष्याला प्रशासनाकडून जीवनदान मिळाले आहे. पक्षी आणि त्याची अंडी वाचविण्याकरिता चक्क ते झाड न तोडण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे, तर ते झाड तोडण्याची परवानगी देणाऱ्या वनविभागानेही आपली परवानगी मागे घेतली आहे.प्राप्त माहितीनुसार, चांदूर बाजार शहरातून वलगावपर्यंत जाणाऱ्या मार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करण्याकरिता रस्त्यालगतची झाडे, जी विकासकामाच्या आड येत आहेत, ती परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.दरम्यान, त्यातील एका कडुनिंबाच्या झाडावर अगदी शेंड्यावर पांढºया मानेच्या करकोचा पक्ष्याचे घरटे आहे. तो पक्षी व त्याची अंडी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा काळे यांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांनी ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे, कनिष्ठ अभियंता ललित बोबडे, परतवाडा वनपरिक्षेत्राचे वनपाल डी.सी. लोखंडे, चांदूर बाजार तहसीलदार जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली.त्या पक्ष्याचे घरटे, पक्षी आणि त्याची अंडी याची खात्री करून घेण्याकरिता ड्रोन कॅमेऱ्याने त्याचे निरीक्षण केले गेले.ड्रोन कॅमेऱ्याने निरीक्षण सुरू असताना त्या पक्ष्याने आपली अंडी वाचविण्याकरिता त्याने ती अंडी आपल्या पंखाखाली घेतली आणि अखेर ते सर्व बघून प्रशासन त्या पक्षाच्या बाजूने उभे राहिले. पक्षी आणि पक्ष्याची ती अंडी वाचविण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाबाबत जिल्हाभरातील पक्षिप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.पिले मोठी होर्ईपर्यंत रोखणार वृक्षतोडझाडावरील पांढऱ्या मानेचा करकोचा पक्षी आणि ती अंडी यांचे पालकत्व उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारले. अंड्यातून त्या पक्षाची पिलं बाहेर आल्यानंतर ती पिलं मोठी होऊन उडून जात नाहीत, तोपर्यंत झाड न तोडण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. पक्षी आणि त्या पक्षाची अंडी वाचविण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारलेली भूमिका, तहसीलदार जगताप व वनपाल डी.सी. लोखंडे यांनी केलेले सहकार्य आणि स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे शिवा काळे यांच्या प्रयत्नांचे पक्षिमित्रांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.पांढºया मानेचा करकोचा पक्षी सर्वसाधारपणे आढळून येत नाही. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पूर्ण वाढ झालेला करकोचा पक्षी उंचीला अडीच ते तीन फुटांपर्यंत असतो. आपल्या कमरेपर्यंत तो येतो. त्याला वाचविणे हे प्रथम कर्तव्य असावे.- विशाल बनसोड, मानद वन्यजीवरक्षक, अमरावतीझाडावरील पांढऱ्या मानेचा करकोचा पक्षी आणि त्याने दिलेल्या अंड्यातील पिलं बाहेर पडून उडण्यास सक्षम होत नाहीत, तोपर्यंत ते झाड तोडले जाणार नाही.- मिलिंद भेंडे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चांदूर बाजारशेड्यूल-४ मधील पक्षी व त्यांची अंडी वाचावीत, याकरीता ते झाड न कापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा.

टॅग्स :forest departmentवनविभागpwdसार्वजनिक बांधकाम विभाग