कारवाई नाही : विकास विद्यालयातील बनावट पटसंख्येचे प्रकरणप्रसन्न दुचक्के - अमरावतीशाळेतील निर्धारित पटसंख्येचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सन २०११-१२ मध्ये स्थानिक विकास विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे १३ विद्यार्थ्यांचा शाळेत बोगस प्रवेश दाखविला. याबाबत २६४ पानांची लेखी तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपशिक्षणाधिकाऱ्यांनी पुऱ्याव्यानिशी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. परंतु पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतीच कारवाई न केल्याने पाणी मुरत असल्याचा आरोप उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांनी केला आहे. विलासनगर परिसरात विकास विद्यालय आहे. मार्च २०१३ मध्ये जिल्हास्तरीय लोकशाही दिनात रामराव चिंधुजी शेंडे यांनी या शाळेतील घोटाळ्याबाबतची तक्रार केली होती.
उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीला पोलिसांचा ‘खो’
By admin | Updated: August 25, 2014 23:40 IST