शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पाच औषधी प्रतिष्ठानांचे परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 00:23 IST

औषधी प्रशासन विभागाने वर्षभरात जिल्ह्यातील ५९३ औषधी विक्रेत्यांची (मेडिकल) तपासणी केली.

५९३ विक्रेत्यांची तपासणी : विभागाची कारवाईअमरावती : औषधी प्रशासन विभागाने वर्षभरात जिल्ह्यातील ५९३ औषधी विक्रेत्यांची (मेडिकल) तपासणी केली. यात औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना काही त्रुटी आढळल्यामुळे ४२ मेडिकल शॉपीचे काही कालावधीसाठी परवाने निलंबन करण्यात आले आहेत. ५ दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्याचीही कारवाई करण्यात आले आहे. ही करवाई १ एप्रिल ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यान करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात किरकोळ औषधी विक्रेत्यांचे १,२०९ मेडिकल आहेत. घाऊक व होलसेल औषधी विक्रेते ३५६ आहेत. ड्रगिस्ट व केमिस्ट विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लघंन झाल्यास औषधी निरीक्षक कारवाई करतात. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे. किरकोळ चुका झाल्यास काही दिवसांसाठी मेडिकल परवाना निलबंन केले जाते. गंभीरप्रकरणी परवाने कायमचे निलंबन करण्याची कारवाई केली जाते. यावर्षी झालेल्या तपासणीत दोषी आढळल्याने ५ मेडिकलच्या संचालकाविरुद्ध कारवाई करून ५ दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्ध करण्यात आले आहेत. काय आहेत नियम ?मेडिकलमध्ये औषधी विक्री करताना नोंदणीकृत फॉर्मासिस्ट अनिवार्य असतो. तसेच किरकोळ औषधी व घाऊक विक्रेत्यांकडे 'फ्रिज' असणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक औषधी विक्री करणाऱ्या ग्राहकाला पक्के बिल दिले पाहिजे, येथे औषधी खरेदी बिल लावलेले असावे, नियम ५६ नुसार सदर तपासणी करण्यात येते, ज्या औषधी कालबाह्य झाल्या आहेत, त्याकरिता मेडिकलमध्ये वेगळा बॉक्स असणे गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी 'एक्सपायरी मेडिसीन नॉट फॉर सेल' असे लिहिलेले असावे, तसेच औषधी प्रशासन विभागाने ठरवून दिलेल्या निकषाच्या आधारे व औषधी डॉक्टरांच्या सूचकतेशिवाय औषधांची विक्री करणे बंधनकारक आहे.