ग्रामीण भागातील पत्रपेटी काळाच्या पडद्याआड
ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, आपल्या नातेवाइकांना किंवा इतरांना काही संदेश द्यायचा असेल तर पत्राच्या माध्यमातून दिला जात होता; मात्र मोबाईलच्या क्रांतीमुळे पत्रपेटी काळाच्या पडद्याआड गेली असल्याचे चित्र दिसत आहे.
ग्रामीण भागामध्ये पोस्टामार्फत पत्रपेटी एखाद्या भिंतीवर लावल्या जात होती. त्या पत्रपेटीमध्ये गावातील नागरिक महत्त्वाचा संदेश असो किंवा कोणताही व्यवहार असो पत्राच्या माध्यमातून केला जात होता. व गावातील नागरिकसुद्धा आपल्या नातेवाइकांची पत्र येईल, म्हणून मोठ्या आशेने पोस्टमनची वाट पाहत असे. परंतु आता प्रत्येकांच्या हातामध्ये मोबाईल आल्याने पत्राकडे कुणीही संदेश देत नसल्याचे समजते.
रक्षाबंधनच्या काळामध्ये राखी पाठवण्यासाठी प्रत्येक बहीण या पत्रपेटीमध्ये आपल्या भावाला राखी पाठवत असे. आता मात्र स्पर्धेच्या युगामध्ये कुणीही असा व्यवहार करत नसल्याचे एकंदरीत चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
सुरवातीच्या काळात अत्यंत महत्त्वाचा संदेश पोहोचवायचा असला तर तार ही सेवा होती; परंतु ती सेवा काही वर्षांपासून बंद पडली आहे.
पोस्टामार्फत अनेक विकासात्मक क्रांती केल्या गेली आहे. अनेक सेवा यामध्ये सरकारने विकसित केल्या असल्या; परंतु पत्रव्यवहार मात्र दुर्लभ झाल्याचे दिसत आहे.
सर्व नागरिकांचे व्यवहार आता मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून होत असल्याने जुन्या सेवा दुर्लभ होतील काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.