शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक महासंघाचे सरन्यायाधिशांना पत्र

By admin | Updated: November 29, 2015 00:58 IST

मेळघाटातील तरूण मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी पंचायतराज समितीच्या धमकीमुळे आत्महत्या केल्याप्रकरणी योग्य कारवाईच्या मागणीसाठी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी....

शेखर भोयर : दखल घेण्याची मागणीअमरावती : मेळघाटातील तरूण मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी पंचायतराज समितीच्या धमकीमुळे आत्महत्या केल्याप्रकरणी योग्य कारवाईच्या मागणीसाठी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी भारताच्या सरन्यायाधिशांना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी केली आहे.सेमाडोह या दुर्गम खेड्यातील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले नकाशे हे सरळमार्गी आणि भ्रष्टाचाराशी संबंध न ठेवणारे शिक्षक म्हणून परिसरात परिचित होते. त्यांनी गैरकारभार केल्याच्या ना तक्रारी आहेत, ना चर्चा. नकाशे प्रामाणिकपणे शिक्षणकार्य करीत असताना कुठल्याशा मुद्यावर पंचायतराज समितीने त्यांना धमकावले आणि त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांचा आहे. सासरे दादाराव वानखेडे यांनी चार आमदार आणि पाच अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रारही नोंदविली. पैकी केवळ उपशिक्षणाधिकारी पंडित पंडागळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पंचायतराज समितीचे सदस्य भरत गोगावले, विकास कुंभारे, समीर कुणावार आणि भाऊसाहेब फुंडकर यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले नाहीत. तक्रारकर्त्यांचे समाधान होईल, अशी प्रगतीही नाही. न्याय आणि कायद्याचा अंमल करणारी यंत्रणा सर्वांसाठीच सारखी असताना याप्रकरणी मात्र सत्तापक्षाचे आहेत म्हणून की काय, पण लोकप्रतिधींसाठी कायदा शिथिल झाल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. ही छबी सुधारण्यासाठी आणि नकाशे कुटुंबीयांच्या न्यायासाठी आपण या प्रकरणाची नोंद घ्यावी, अशी विनंती या पत्रातून भोयर यांनी केली आहे.