अमरावती : सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था पूर्णामाय अपंग व पुनर्वसन केंद्र इमारतीच्या उद्घाटनाला ५ फेब्रुवारी रोजी टोंगलापूर मासोद, कुरळपुर्णा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २ हजार अपंग बांधवांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यावेळी भूमिपुत्र फाऊंडेशनचा, शुभारंभ कृषी पर्यटन केद्राचे भूमिपूजन व श्री संत गुलाबराव महाराज कृत्रिम अवयव निर्मिती केंद्राचे शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती विश्रामगृह अमरावती येथे बुधवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेत आ. बच्चू कडू यांनी दिली. पूर्णामाय अपंग - अनाथ पुनर्वसन केंद्राच्यावतीने अपंग, अनाथ मुकबधीर, अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण, क्रीडा, आरोग्य सेवा, उद्योग कर्मशाळा रोजगार देऊन त्यानचे संपूर्ण पुनवर्सन केल्या जाते असते आ. कडू यांनी सांगितले. पत्रपरिषदेला धीरज जयस्वाल, जोगेंद्र मोहड, नीलेश सावरकर, बबलू माहुरकर, प्रदीप निमकर्डे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)२५ अपंग बांधवांना धनादेश देणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी धनादेश वाटप करण्यात येणार आहे. २५ एकराचा जागेवर अपंगपूर्णा केंद्र स्थापन करण्यात येणार असून येथे अपंगांना शिक्षण आरोग्याच्या सुविधा मिळणार आहे. याकरिता आतापर्यंत २ कोटी निधी खर्च झाला झाला आहे.बायोमेट्रिक पद्धतीने मिळणार पैसेश्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना घरपोच बायोमेट्रिक पद्धतीने त्यांना पैसे मिळणार आहे. त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होऊन त्यांना एटीएमसारखे काढता येणार आहेत. गाडगेबाबा अनाथ व अपंग योजना शासनाकडे प्रस्तावितश्री संत गाडगेबाबांच्या नावे, गाडगेबाबा अनाथ व अपंग योजना शासनाकडे प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेतून अपंग व अनाथांना हक्काचे घरकुल मिळणार आहे. यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे आ. बच्चू कडू यांनी सांगितले. विधवा महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ७५० कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०० कुटुंबांचे अर्ज निकाली निघेल. प्रहार हा सामाजिक पक्ष अनेक आंदोलन यशस्वी करुन न्याय मिळाला.
५ फेब्रुवारीला मुख्यमंत्री चांदूरबाजारात पत्रपरिषद : बच्चू कडू यांनी दिली माहिती
By admin | Updated: February 4, 2016 00:25 IST