शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या वाहनात ‘आओ स्कूल से घर चले हम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:01 IST

तिवसा तालुक्यातील फत्तेपूर येथील काही विद्यार्थी परतीच्या प्रवासासाठी मोझरी बस थांब्यावर ताटकळत होते अन् नेमक्या याच वेळी ना. यशोमती ठाकूर या अमरावतीकडे जात होत्या. त्यांनी आपली गाडी थांबविण्याची सूचना चालकाला केली अन् त्या थेट पोहोचल्या विद्यार्थ्यांमध्ये. ना. ठाकूर यांना बघून गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी भीड चेपल्यानंतर वाहनाच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नेहमीप्रमाणे त्या बसची प्रतीक्षा करीत बसथांब्यानजीक बसलेल्या. अनेकींच्या चेहऱ्यावर त्रासिक त्राण. अचानक त्यांच्याजवळ वाहनांचा काफिला थांबतो. त्या दचकतात, पण चेहरा ओळखीचा दिसल्याने हरखतातदेखील. त्या त्यांच्यासोबत गप्पा करतात अन् त्यांना लिफ्टदेखील देतात. १४ डिसेंबर रोजी तिवसा तालुक्यातील मोझरी बस थांब्यावरचा हा प्रसंग. त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना लिफ्ट देणाऱ्या चक्क राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर होत्या. तिवसा तालुक्यातील फत्तेपूर येथील काही विद्यार्थी परतीच्या प्रवासासाठी मोझरी बस थांब्यावर ताटकळत होते अन् नेमक्या याच वेळी ना. यशोमती ठाकूर या अमरावतीकडे जात होत्या. त्यांनी आपली गाडी थांबविण्याची सूचना चालकाला केली अन् त्या थेट पोहोचल्या विद्यार्थ्यांमध्ये. ना. ठाकूर यांना बघून गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी भीड चेपल्यानंतर वाहनाच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले. ना. ठाकूर यांनी क्षणात त्यांना आपल्या गाडीत बसवून थेट गावी फत्तेपूर इथे पोहचवून दिले. 

आनंदाचे डोही आनंद तरंगकाही किलोमीटरच्या या प्रवासात पालकमंत्री अन् विद्यार्थी यांच्यात चांगल्याच गप्पागोष्टी रंगल्या. हे सहज घडलेय. पण, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबतचा प्रवास अन् गप्पाही हा प्रसंग मात्र त्या विद्यार्थ्यांसाठी कायम आठवणीत राहणारा अन् ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असाच ठरला.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर