शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बुधवारपासून ‘कॉलेज चले हम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 05:00 IST

जिल्ह्यात एकूण ११८ महाविद्यालये असून, २ लाख २५ हजारांच्या घरात विद्यार्थिसंख्या आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून महाविद्यालये सुरू व्हावीत, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालकांची आहे.  मुळात किती विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले? जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, तथापि प्रवेश अमरावती शहरातील महाविद्यालयात आहे, अशा विद्यार्थ्यांचे लसीकरणाची काय स्थिती असेल, हे तूर्त कळू शकले नाही. मात्र, राज्य शासनाने महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्ग ओसरताच शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीणमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आता शासनाने २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दीड वर्षापासून बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी संस्थाचालकांना विद्यार्थी सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल, हे विशेष. विद्यार्थ्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात एकूण ११८ महाविद्यालये असून, २ लाख २५ हजारांच्या घरात विद्यार्थिसंख्या आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून महाविद्यालये सुरू व्हावीत, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालकांची आहे.  मुळात किती विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले? जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, तथापि प्रवेश अमरावती शहरातील महाविद्यालयात आहे, अशा विद्यार्थ्यांचे लसीकरणाची काय स्थिती असेल, हे तूर्त कळू शकले नाही. मात्र, राज्य शासनाने महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. संस्थाचालक कर्मचारी, विद्यार्थ्यांचे लसीकरणाबाबत आता नियोजन करण्यात येईल, असे दिसून येते. मात्र, दिवाळीपूर्वी कॉलेज सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ही बाब आनंदाची ठरली आहे. 

कोणत्या महाविद्यालयात काय काळजी घेतली जातेय? महाविद्यालये उघडण्याचा निर्णय झाला. त्याबाबत गाईडलाईन पाळले जाईल. सॅनिटायझेशन, शारीरिक अंतराचे पालन, नो मास्क, नो एन्ट्री, अनावश्यक गर्दी टाळली जाईल.- आराधना वैद्य, प्राचार्य, भारतीय महाविद्यालय

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय योग्य आहे. जिल्हाधिकारी जे काही गाईडलाईन देतील, त्याचे पालन केले जाईल. वर्गखोल्यांची क्षमता बघून नियोजन केले जाईल. विद्यार्थी क्षमतेप्रमाणे नियोजनाला प्राधान्य असेल.-राजेश देशमुख, प्राचार्य, बॅ. आरडीआयके व केडी, बडनेरा.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. आता वरिष्ठ महाविद्यालये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू करण्याचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे. शिक्षणापासून दूर गेलेले विद्यार्थी पुन्हा प्रवाहात येतील. हा निर्णय कोरोनाची दुसरी लाट ओसरताच व्हायला हवा होता. -राजेश वाटाणे, विद्यार्थी, केशरबाई लाहोटी महाविद्यालय

राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून महाविद्यालयात ये-जा केली जाईल. गत दीड वर्षापासून कॉलेज बघितले नव्हते. आता दिवाळीपूर्वीच महाविद्यालये सुरू होणार असल्याने आनंद आहे. - पराग वानखडे, विद्यार्थी, विद्याभारती कॉलेज ऑफ फार्मसी

 

टॅग्स :collegeमहाविद्यालय