रक्तदान शिबिर : लोकमतचा उपक्रमअमरावती : रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. म्हणूनच ही रक्ताची नाती जोडण्यासाठी ‘लोकमत’ व ‘युवा आॅर्गनायझेशन’तर्फे उद्या, गुरुवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.‘लोकमत’ चे संस्थापक -संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या ९२ व्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत भवन, विभागीय क्रिडा संकूल, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे शिबिर होईल. यामध्ये युनिक अकादमी, प्रहार संघटना व युवा नेक्स्टचे सहकार्य लाभणार आहे. आपल्या रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचवू शकतो, म्हणूनच या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.
चला जोडूया रक्ताची नाती...
By admin | Updated: July 2, 2015 00:14 IST