शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधार्यांना सळो की पळो करुन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST

दर्यापूर :- सत्ताधारी शेतकऱ्यांच्या प्रश्नासह सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी असमर्थ ठरले असून भाजपा कार्यकर्त्यांनी या विरोधात निवेदन, उपोषण, ...

दर्यापूर :- सत्ताधारी शेतकऱ्यांच्या प्रश्नासह सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी असमर्थ ठरले असून भाजपा कार्यकर्त्यांनी या विरोधात निवेदन, उपोषण, आणि आंदोलनाचा मार्ग अवलंबून यांना सळो की पळो करुन सोडावे असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दर्यापूर येथे केले.

भाजपचे सरकार असताना विदर्भातील रस्ते पूर्ण झाले, कालव्याचे कामे पूर्ण झाले अनेक धरणे अपूर्ण पूर्ण झालीत विदर्भातील जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी मिळाले पिकामध्ये उत्पादकता वाढली या बरोबरच ज्या क्षेत्रात अनुशेष शिल्लक होता त्या क्षेत्रातील कामे सुद्धा झपाट्याने प्रगती पथावर नेलीत मात्र महाविकास आघाडी सरकारचा गेल्या बावीस महिन्यातील कार्यकाळात सगळेच कामे कोरोनाच्या नावाखाली ठप्प झाली असून शेतकऱ्यांच्या पिक विम्यासह अनेक प्रश्नावर दुर्लक्ष करण्याचे काम हे सरकार करीत आहे. या सरकारच्या पोपटाचा प्राण सत्तेत अडकला असून आगामी निवडणुकात त्यांना धडा शिकून त्यांना चोक उत्तर देण्याचे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दर्यापूर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. चंद्रकांत पाटील अमरावती वरून अकोला कडे जात असताना दर्यापूर येथे आ. प्रकाश भारसाकळे यांच्या निवासस्थानीकाही काल थांबले होते त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांचे सोबत माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोन्डे,आ. प्रकाश भारसाकळे,आ. प्रताप अडसड, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी, माजी आ. रमेश बुंदिले, उपेंद्र कोठेकर, नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बॉक्स :- भाजप विना त्यांनी खासदार होऊन दाखवावे..

शिवसेना नेते वारंवार पाठीत खंजीर खुपसल्याचा उल्लेख करतात मात्र खऱ्या अर्थाने पाठीत खंजीर खुपसणारे कोण हे जनतेला माहीत असून अरविंद सावंत माझ्या विरोधात बोलतात मात्र त्यांनी भाजप शिवाय लोकसभा मतदारसंघात निवडून येऊन दाखवावे असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दर्यापूरात बोलताना केले.

030921\img-20210903-wa0009.jpg

सत्ताधार्यांना सळो की पळो करुन सोडा ( चंद्रकांत पाटील यांचे भाजप कार्यकर्त्यांना संदेश )