शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मुलीला स्वत:च्या पायावर उभे करण्याची जिद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:13 IST

तो अंध. तीही त्याचीच सावली. ते अमरावतीत येतात. सोबत मुलगीही असते. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांकडे ते मदत मागतात. लोक मात्र अंध म्हणून त्यांची हेटाळणी करतात.

अमरावती : तो अंध. तीही त्याचीच सावली. ते अमरावतीत येतात. सोबत मुलगीही असते. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांकडे ते मदत मागतात. लोक मात्र अंध म्हणून त्यांची हेटाळणी करतात. पदवीधर असलेला अंध नवरा लोकांना जेव्हा आपल्यावर गुदरलेला प्रसंग कथन करतो आणि माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी मदत द्या, भीक नको, असे रोखठोक सांगतो तेव्हा आपसूकच त्यांच्या चेहºयावरचा कणखरपणा स्पष्टपणे जाणवतो.मुलीच्या शिक्षणाची काळजी वाहणारे हे अंध दाम्पत्य आहे वर्षा व बंडू इरतकार. गाव खरबी, ता. चांदूर रेल्वे. मुंबईत तो उदरनिर्वाहाकरिता गेला आणि चांगला कमावत असतानाच डोळे गमावून गावी परतला. सामाजिक बांधीलकीतून त्याने अंध वर्षाशी विवाह केला. या दाम्पत्याला चार वर्षांची गोंडस मुलगी आहे. चिमुकल्या अक्षराला उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. मुलीला चांगल्या शाळेत प्रवेश मिळण्याची त्यांची इच्छा. वर्षाच्या आग्रहावरून घुईखेडवरून हे दाम्पत्य आठवड्यातून तीन दिवस एसटीने अंबानगरीत येतात. मदतीचे हात यावेत, हीच त्यांची अपेक्षासमाजभावनेला सादबंडू इरतकार पदवीधर आहे. त्याची पत्नीही समजूतदार आहे. चांगले शिक्षण घ्यायचे असल्यास किती आटापिटा करावा लागतो, याचे या दाम्पत्याला भान आहे. त्यामुळेच ते समाजभावनेला साद घालून मदतीची (भीक नव्हे) याचना करतात. त्यांना खºया अर्थाने मदतीचे हात मिळणे गरजेचे आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, समाजसेवी संस्थांनी याबाबत सुहृद विचार करण्याची गरज आहे.