शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

महास्वच्छता अभियानाकडे सत्ताधाऱ्यांची पाठ

By admin | Updated: June 3, 2015 00:26 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोर्शी नगर परिषदेच्या हद्दीत आ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नातून महास्वच्छता ...

मोर्शीतील प्रकार : नदीतील गाळ काढण्याचे काम बंदमोर्शी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोर्शी नगर परिषदेच्या हद्दीत आ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नातून महास्वच्छता अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमास नगर परिषदेच्या सत्तारुढ गटातील पदाधिकारी व नगरसेवक अनुपस्थिती राहिले. आम्हाला या कार्यक्रमास बोलाविण्यात आले नव्हते, अशी या गटाची ओरड आहे. देश पातळीवर स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना मोर्शी विधानसभा मतदारसंघातही हा उपक्रम राबविण्यात यावा या संकल्पनेतून आ. अनिल बोंडे यांनी वरुड, शेंदूरजनाघाट आणि मोर्शी या तीन नगरपरिषदांच्या शहरात महास्वच्छता अभियान राबविण्याचे ठरविले.कार्यक्रमाची रुपरेषा स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ठरविण्यात आली. त्यात नगराध्यक्ष, नगरसेवक शहर आणि गाव खेड्यातील नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी उपास्थित होते. आमदार, खासदार निधीतून प्रत्येकी ३ लाख मिळून ६ लक्ष रुपये या कार्यासाठी मिळवून देण्याचे आश्वासनही आ. बोंडे यांनी दिले होते. शहरातून वाहणाऱ्या दमयंती नदीतील गाळ काढून, बेशरम वनस्पतीच्या निर्मूलनाच्या कार्याचा शुभारंभ आ. अनिल बोंडे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.त्या अनुषंगाने आ. बोंडे यांनी जेसीबीचे पूजन करुन कार्याचा शुभारंभ केला. याप्रसंगी मुख्याधिकारी गीता ठाकरे, नगरपरिषदेचे अभियंता गणवीर, विद्युत विभागाचे प्रशांत खोडे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता हर्षल पवार, नगरसेवक नितीन उमाळे, अजय आगरकर, सुनीता कुमरे, आप्पा गेडाम, ब्रम्हानंद देशमुख आणि शिवाजी बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष संजय उल्हे, सचिव शेखर चौधरी, शरद कणेर व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते; तथापि सत्तारुढ गटातील एकही नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. मात्र त्यांना निमंत्रण नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.(तालुका प्रतिनिधी)निमंत्रण नव्हते !वास्तविक नगरपालिकेच्या हद्दीत महास्वच्छता अभियान राबविण्याचे ठरल्यावर आ. अनिल बोंडे यांनी आयोजित बैठकीस नगराध्यक्षांसह सत्तारुढ नगरसेवक उपस्थित असताना, आम्हाला बोलाविण्यात आले नव्हते, अशी सत्तारुढ गटाच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. सत्तारुढ गटाची अनुपस्थिती आ. बोंडे यांना विरोध दर्शविणारी तर नाही ना ? किंवा या कार्यक्रमाची धुरा मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्याकडे असल्यामुळे त्यांना विरोध म्हणून तर सत्तारुढ गट अनुपस्थित नव्हता, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नदीचा गाळ काढण्यासाठी लावण्यात आलेल्या जेसीबीचे पैसे आम्ही देणार नाही, अशी भूमिका सत्तारुढ गटाने घेतली.