शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बांधावर खतपुरवठा योजनला शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: July 5, 2014 23:20 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन २०१२ मध्ये सुरू केलेल्या बांधावर खतपुरवठा योजनेला जिल्ह्यात उतरती कळा आली आहे. मागील दोन वर्षांपासून या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसादच दिला नाही.

अमरावती : राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन २०१२ मध्ये सुरू केलेल्या बांधावर खतपुरवठा योजनेला जिल्ह्यात उतरती कळा आली आहे. मागील दोन वर्षांपासून या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसादच दिला नाही. यंदा तर बांधावर खत पुरवठ्याची मागणीच नोंदविली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागाने सन २०१२ मध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खताचा थेट गावातच पुरवठ्यासाठी बांधावर खत पुरवठा योजना सुरू केली. पहिल्या वर्षी या योजनेंतर्गत जिल्ह्यात खरीप हंगामात जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विदर्भ को-आॅप. मार्केटिंग सोसायटी यांच्या मार्फत शेतकरी गटाला ४५० मे टन खताचा बांधावर पुरवठा केला होता. त्यानंतर याच वर्षी रबी हंगामात मागणी नसल्याने निरंक राहिला तर सन २०१३ मधील खरीप हंगामात ९७.५० मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला. रब्बी हंगाम मात्र निरंक आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सुरुवात झाली. पाऊस नसल्याने बाजार थंड आहे. पण यावर्षी शासनाकडे खताचा बंफर स्टॉक नसला तरी खतसाठा जिल्ह्यात मुबलक आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी समूह गटाकडे कुठल्याही गावातील शेतकऱ्यांनी रासायनिक खताची मागणी नोंदविली नाही. परिणामी शेतकरी गटानेही रासायनिक खतपुरवठा करणाऱ्या नोडल अधिकारी यांच्याकडेही सध्या तरी रासायनिक खताची बांधावर पुरवठ्यासाठी मागणी नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र बांधावर खत पुरवठ्याची मागणी शेतकरी गटाकडून झाल्यास रासायनिक खतपुरवठा केला जाणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परंतु मागील दोन वर्षातील खरीप व रब्बी हंगामातील या योजनेचे चित्र पहाल्यास योजनेला जिल्ह्यात थंड प्रतिसाद मिळाला असून भविष्यात ही योजना बंद पडण्याची चिन्हे आहेत.