शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कुख्यात गुंडाच्या अंत्ययात्रेकडे समाजबांधवांची पाठ

By admin | Updated: April 21, 2017 00:13 IST

येथील कुख्यात गुंड अशोक गजभिये ऊर्फ खांडेराव याची बडनेरा शहरात दहशत होती. हत्या, बलात्कार, विनयभंग तसेच खंडणी यांसह इतरही गंभीर गुन्हे

आरोपींना दोन दिवसांचा पीसीआर : भाचीने नोंदविली तक्रारबडनेरा : येथील कुख्यात गुंड अशोक गजभिये ऊर्फ खांडेराव याची बडनेरा शहरात दहशत होती. हत्या, बलात्कार, विनयभंग तसेच खंडणी यांसह इतरही गंभीर गुन्हे त्याच्यावर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यापूर्वी देखील दोनदा त्याचा ‘अक्कू यादव’ करण्याचा प्रयत्न झाला असताना समयसुचकता राखून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, यावेळी तो वाचू शकला नाही. विशेष म्हणजे गुरूवारी त्यांच्या अंत्यसंस्कारात अगदीच नगण्य समाजबांधव सहभागी झाले होते. अशोक गजभिये हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अशोक गजभिये हा ९ मार्च २०१७ पासून न्यायालयीन कोठडीत होता. मंगळवार १८ रोजी तो जामिनावर घरी आला होता. त्याच रात्री त्याचा खून करण्यात आला. अशोक गजभिये याची बडनेरा शहरात दहशत होती. त्याच्यावर बलात्काराच्या गुन्ह्यासह विनयभंगाचे चार गुन्हे दाखल होते. एका विनयभंगाच्या गुन्ह्यात त्याला शिक्षादेखील झाली असून तो तडीपारसुद्धा होता. दरोड्याचा प्रयत्न, अश्लील वर्तणूक, जातीय दंगा घडविण्याचे गुन्हे, खंडणी मागणे, शस्त्र बाळगणे अशा गुन्ह्यांची पोलीस खात्यात नोंद आहे. सन २०१४ मध्ये त्याने बडनेरा पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीवर कार्यरत महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली होती. घटनेतील दगड जप्तबडनेरा : पोलिसांवर दबावतंत्राचा वापर, व्यापाऱ्यांना धमकावून पैशांची वसुली अधिकाऱ्यांना दमदाटी करणे आदी प्रकारांमुळे अशोक गजभिये याने बडनेरा शहरात दहशत निर्माण केली होती. सन २००६ मध्ये त्याने महिलेचा विनयभंग केल्याने जयहिंद चौकात काही महीलांनी त्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर सन २०१४ मध्येदेखील होलीक्रॉस मार्गावर महिला व पुरूषांनी त्याला सामूहिक चोप दिला होता. यादोन्ही घटनांनंतर तो पळून गेला. अशोकची दहशत संपविण्यासाठी त्याचा अक्कू यादव करण्याचा प्रयत्न दोनदा झाला. अशोक गजभिये याच्या हत्येप्रकरणी हिरामण रामजी रोकडे व संतोष सुधाकर परताडे यांना पोलिसांनी बुधवार १९ रोजी न्यायालयासमोर हजर केले होते. यादोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मारहाणीतील दगड जप्त केला आहे. अशोक गजभिये याच्या तीन नातेवाईकांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मेहेत्रे करीत आहेत. याप्रकरणात अद्याप पोलिसांनी केवळ दोन आरोपींना अटक केली आहे.