शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
6
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
7
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
8
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
10
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
11
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
12
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
14
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
15
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
16
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
17
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
18
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
19
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

पाच लाख मतदारांची राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:12 IST

जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील ...

अनास्था : पाच वर्षांत ६० हजार मतदार वाढूनही यंदा टक्का ‘जैसे थे’अमरावती : जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील १३ लाख ९० हजार ९०२ मतदारांपैकी ९ लाख ६६ हजार ५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, चार लाख ८४ हजार ३६१ मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविल्याचे अंतिम आकडेवारीनंतर स्पष्ट झाले. यापूर्वी २०१२ च्या निवडणुकी इतकी ही मतांची टक्केवारी आहे.यापूर्वी ७ नोव्हेंबर २०१२ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत १३ लाख ३२ हजार १९८ मतदारांपैकी आठ लाख ६६ हजार ५२३ मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये तीन लाख ९४ हजार ७८९ पुरुष व चार लाख ७१ हजार ७३४ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ही ६५.०४ टक्केवारी होती. यावेळेस ५८ हजार ७०४ मतदार वाढले व चार नगरपंचायतींचे किमान ४० हजार मतदान कमी झाले, असे एकूण १३ लाख ९० हजार ९०२ मतदार होते. यापैकी चार लाख ८९ हजार २८८ पुरुष व चार लाख १७ हजार २५० स्त्री असे एकूण नऊ लाख सहा हजार ५४१ स्त्री मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत दोन लाख ३६ हजार पुरुष व दोन लाख ४८ हजार २ असे एकूण चार लाख ८४ हजार ३६१ मतदारांनी मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. सकाळच्या पहिल्या दोन तासात केवळ ८७ हजार ९८७ मतदारांनी मतदान केले. त्यानंतर मात्र मतदानाचा टक्का थोडा वाढला. दुपारी दीड पर्यंत चार लाख ६७ हजार ८३७ व साडेतीन पर्यंत सहा लाख ७० हजार १६३ व अंतिम क्षणापर्यंत म्हणजेच सायंकाळी साडेपाच पर्यंत एकूण नऊ लाख ६५ हजार ५४१ मतदारांनी मतदान केले.दोन लाख ३६ हजार पुरुष मतदारांचा अनुत्साहजिल्ह्यात पुरुष मतदारांचा टक्का अधिक आहे. या निवडणुकीत ७ लाख २५ हजार ६३० पुरुष मतदार होते. यापैकी ४ लाख ८९ हजार २८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर २ लाख ३६ हजार ३४२ मतदारांनी मतदान करणे टाळले. प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असल्याने मतदानाचा टक्का यापूर्वीच निवडणुकीपेक्षा अधिक राहील, अशी अपेक्षा होती. कमी मतदानाचा कुणाला धक्का बसणार, हे गुरूवारी स्पष्ट होईल.अडीच लाख स्त्री मतदारांनी टाळले मतदानया निवडणुकीत दोन लाख ३६ हजार ३४२ पुरुषांनी मतदान करणे टाळले. त्या तुलनेत स्त्री मतदार अधिक माघारले आहे. यावेळी चार लाख १७ हजार २५० स्त्री मतदारांपैकी दोन लाख ४८ हजार २ स्त्री मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविली आहे. दिवसाचा पारा ३९ अंशावर, प्रचाराला केवळ ६ दिवसाचा अवधी व तूर, हरभऱ्याचा हंगामामुळे ग्रामीण भागात स्त्री मतदारांनी अनुत्साह दाखविल्याचे दिसून येते. महिलांचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासनाद्वारा अधिक जनजागृतीची गरज आहे.चार नगरपंचायतींचे ४० हजार मतदार कमीजिल्ह्यात मागील वर्षी तिवसा, धारणी, नांदगाव खंडेश्वर व भातकुली या तालुक्याच्या मुख्यालयी नगरपंचायती स्थापित झाल्या व हे क्षेत्र नागरी झाल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वगळण्यात आले. त्यामुळे या वेळेच्या निवडणुकीत किमान ४० हजार मतदार कमी झाले. जिल्ह्यात पाच वर्षात ५८ हजार युवा मतदार वाढले असले तरी ४० हजार मतदान कमी झाल्याने अपेक्षित मतदान टक्केवारीचा टक्का माघारला. यंदाही भातकुली तालुका टक्केवारीत माघारलायंदाच्या निवडणुकीत चांदूरबाजार तालुक्यात ६८.०९ टक्के मतदान झाले. टक्केवारी हा तालुका अव्वल आहे. मात्र भातकुली तालुका शेवटच्यास्थानी राहीला. या तालुक्यात फक्त ५८.४९ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या निवडणुकीत देखील हा तालुका शेवटच्या स्थानी होता. त्यावेळी ५९.०८ टक्के मतदान झाले होते.