शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू बंगल्यांकडे बिबट्याच्या फेऱ्या, सुरक्षारक्षकांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2022 00:00 IST

विद्यापीठाच्या तलाव परिसरात २०१७ मध्ये बिबट्याने गायीची शिकार केल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हापासून विद्यापीठात बिबट्याचे जोडपे दिसून येत आहे. विद्यापीठाने बिबट्याचा संचार असलेल्या भागात फलक लावून प्रवेश मनाई केली आहे. असे असले तरी बिबट्या हा शिकार करण्यासाठी परीक्षा विभाग, कुलगुरू बंगला, कँटीनपर्यंत येत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून सिद्ध झाले आहे. अतिथीगृह, कुलगुरूंच्या बंगला परिसरात बिबट्या आढळून येणे ही नित्याचीच बाब झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याचा संचार ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, गत काही दिवसांपासून बिबट्याच्या कुलगुरूंच्या बंगल्याकडे फेऱ्या वाढल्या आहेत. श्वानाच्या शिकारीसाठी कुलगुरू बंगल्याच्या मागील बाजूस तो दबा धरून बसत असून, सुरक्षारक्षकांच्या जीविताला धोका मानला जात आहे. गत आठवड्यात शुक्रवारी रात्री ८ वाजता बिबट कुलगुरू बंगल्याच्या मागे आढळून आला, हे विशेष.विद्यापीठाच्या तलाव परिसरात २०१७ मध्ये बिबट्याने गायीची शिकार केल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हापासून विद्यापीठात बिबट्याचे जोडपे दिसून येत आहे. विद्यापीठाने बिबट्याचा संचार असलेल्या भागात फलक लावून प्रवेश मनाई केली आहे. असे असले तरी बिबट्या हा शिकार करण्यासाठी परीक्षा विभाग, कुलगुरू बंगला, कँटीनपर्यंत येत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून सिद्ध झाले आहे. अतिथीगृह, कुलगुरूंच्या बंगला परिसरात बिबट्या आढळून येणे ही नित्याचीच बाब झाली आहे. 

विद्यापीठात घनदाट वृक्ष, पाणी, शिकारही गत पाच वर्षांपूर्वी विद्यापीठात एक बिबट्या आढळून आला होता. आता बिबट्यांची संख्या १० च्या पुढे गेली आहे. बिबट्याला दडून बसण्यासाठी घनदाट वृक्ष, झाडी, पाणी आणि शिकारीची सोय असल्याने ते विद्यापीठ सोडून जंगलात जात नाही. मात्र, विद्यापीठात श्वानांची संख्या रोडावल्याने बिबट्या शिकारीसाठी परिसर पिंजून काढत आहेत. 

पिंजरे लागले, पण बिबट्या अडकेना विद्यापीठात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्याच्या संचार मार्गावर वन विभागाने पिंजरे लावले. पिंजऱ्यात शेळीदेखील बांधली; पण बिबट्या पिंजऱ्यात अडकत नसल्याने कालांतराने वन विभागाने हे पिंजरे हटवून घेतले. बिबट्यांवर पाळत ठेवण्यासाठी वन कर्मचारी अधूनमधून विद्यापीठात गस्त घालतात. मात्र, विद्यापीठात एखाद्यावेळी बिबट्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अलीकडे त्याच्या हालचालींंवरून दिसून येते.

 

टॅग्स :leopardबिबट्या