शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात कुलगुरू बंगल्याच्या परिसरात बिबट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:41 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कुलगुरू बंगल्याच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास बिबट आल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

ठळक मुद्देबुधवारी मध्यरात्री कॅमेऱ्यात कैद : नव्याने लावले पाच ट्रॅप कॅमेरे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कुलगुरू बंगल्याच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास बिबट आल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे बिबट हा विद्यापीठ परिसरातच दडून असल्याचे स्पष्ट होते. मध्यरात्री तो कुत्र्यांची शिकार करण्यासाठी बाहेर पडला असावा, असा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सोमवारी अमरावतीत अर्थसंकल्पीय नियोजन आढावा घेण्यासाठी आले असता, काही सुजाण नागरिकांनी त्यांची भेट घेऊन विद्यापीठ परिसरातील बिबट्याचा मुक्त संचार रोखण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने मुनगंटीवार यांनी अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मंगळवारी वनविभागाची चमू विद्यापीठात दाखल झाली. या चमूने बिबट्याचे संचार मार्ग बघितले. त्यानंतर वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांनी संचार मार्गावर अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे बसविले. बुधवारी रात्री १ वाजता कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या बंगल्याच्या परिसरातील ट्रॅप कॅमेºयात बिबट कैद झाल्याचे वनविभागाने सांगितले. हा बंगला मुलींच्या वसतिगृहालगत आहे. बाजूला दाट हिरवळ आहे. विद्यापीठ परिसरात दोन बिबट आहेत. मोर, माकडं वा कुत्र्यांच्या शिकारीसाठी बिबट येत असल्याचे वास्तव आहे. यामुळे सुरक्षा रक्षक धास्तावले आहेत. बिबट्याचा मुक्त संचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे पत्र वनविभागाला दिल्याची माहिती सहायक कुलसचिव (सुरक्षा विभाग) रवींद्र सयाम यांनी ‘लोकमत’ला दिली.दरम्यान, विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृह परिसरातच सतत बिबट्याचा संचार निदर्शनास येत असल्याने विद्यार्थिनींमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. सायंकाळी ६ ते ७ वाजताच वसतिगृह परिसर निर्मुनष्य होतो. मुलींना सायंकाळचे जेवण करावयास मेसमध्ये जाताना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.विद्यापीठात बिबट्याचा संचार असल्याचे सर्वश्रुत आहे. अगोदर काही ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. बुधवारी अतिरिक्त पाच ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. याद्वारे बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. बिबट जेरबंद करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला जाईल.- कै लास भुंबरवनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी