शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

बिबट अद्यापही विद्यापीठातच दडून

By admin | Updated: July 14, 2015 00:56 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात वारंवार बिबट दृष्टीस पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात वारंवार बिबट दृष्टीस पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सलग तीन दिवस बिबट्या आढळून आल्याने तो विद्यापीठ परिसरातच दडून बसल्याची चर्चा असून विद्यापीठ परिसरात वाढलेली झुडपी कापून स्वच्छता ठेवण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहे. परिसरात वनकर्मचाऱ्यांनी गस्तदेखील वाढविली आहे.विद्यापीठ परिसरलगतच वडाळी वनपरिक्षेत्राचे जंगल आहे. तेथील वन्यप्राणी विद्यापीठात येत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने परिसराच्या चौफेर संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरु केले. मात्र, अद्यापपर्यंत हे बांधकाम पूर्ण झाले नसून १० ते २० फुटांचा भिंतीचा भाग अद्यापही खुला आहे. या खुल्या भागातून बिबट्याने विद्यापीठ परिसरात प्रवेश केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर भिंतीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाला दिल्या आहेत. विद्यापीठात 'बिबट्यापासून सावधान'चे फलकविद्यापीठ प्रशासनाने बिबट्यापासून सावध राहण्याच्या सूचना विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. प्रवेशद्वारासमोरच ‘सावधान’चा फलक लावण्यात आला आहे. प्रवेशद्वारासमोर लावलेले फलक पाहून विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.