शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पोहऱ्याच्या शेतशिवारात बिबट्यांच्या पाऊलखुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:09 IST

ताज्या पाऊल खुणांनी जाहीर केले अस्तित्व ,गाव शिवारात नजीकचा मुक्काम पावसाळ्यातही कायम ठेवला आहे फोटो पी ०२ पोहरा पोहरा ...

ताज्या पाऊल खुणांनी जाहीर केले अस्तित्व ,गाव शिवारात नजीकचा मुक्काम पावसाळ्यातही कायम ठेवला आहे

फोटो पी ०२ पोहरा

पोहरा बंदी : शुक्रवारी भानखेडा ते पोहरा मार्गावरील शेतात आढळलेल्या ताज्या पाऊलखुणांनी बिबट्याचे अस्तित्व असल्याचे दाखवून दिले; त्यामुळे पेरणीपश्चात मशागतीसाठी जाणाऱ्या मजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात पहिल्यांदाच बिबट्या शेतीशिवारात आढळून आल्याचे ग्रामस्थ सांगतात. शुक्रवारी पोहरा येथील शेतमालक उपसरपंच हरुण शहा पहाटे शेतात गेले असता त्यांना त्यांच्या शेतात बिबट्याच्या पायांचे ताजे ठसे आढळून आले. यावरून पावसाळ्यातही शेतीपरिसरात बिबट्याचा वावर असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या व शिकारीच्या शोधात बिबट्याचा शेतशिवारापर्यंत मुक्त संचार दृष्टीस पडतो. मात्र पावसाळ्यात गडद, हिरव्यागार जंगलात मुबलक पाणीसाठा व अन्य वन्यप्राण्यांची संख्या अधिक असल्याने बिबट्याला भूक शमविण्यासाठी पोषक वातावरण आहे. तरीसुद्धा पावसाळ्याच्या दिवसांत बिबट्या गावानजीकच्या शेतीशिवारात शिकारीच्या शोधात येत असल्याचे बिबट्याच्या पाऊलखुणांवरून स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यात रानडुक्कर, काळवीट, हरीण, नीलगाय या वन्यप्राण्यांचे कळप शेतातील पिकांकडे आकृष्ट होतात. शेतशिवारात शिरकाव करून पिकांची नासाडी करतात. त्यामागोमाग त्यांची शिकार करण्याकरिता पाठलाग करीत बिबट्याने शेतशिवारापर्यंत मजल गाठली आहे. पोहरा, चिरोडी, भानखेडा, कस्तुरा, सावंगा लालखेड, हातला, इंदला, बोडना, कारला, घात खेडा, पिंपळखुटा ही गावे जंगलालगत आहेत; त्यामुळे गावानजीकच्या शेतीशिवारात बिबट्यांच्या पाऊलखुणा आढळून आल्याच्या घटनेने शेतकरी, शेतमजूर भयभीत झाले आहेत.

कोड

माझ्या शेतात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्याने मी घाबरलो. सध्या शेतात पीकपेरणीची कामे असल्याने शेतकरी व शेतमजूर शेतात राबतात, त्यावेळी बिबट्या मनुष्यासाठी धोकादायक ठरू शकतो; त्यामुळे त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

हरुण शहा शेरू शहा (उपसरपंच )

पोहरा बंदी