शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील खैरी शिवारात बिबट जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:42 IST

अचलपूर तालुक्यातील खैरी-दोनोडा गावाच्या खैरी शिवारात वन व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त कारवाईत एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. सदर बिबट तीन ते चार वर्षे वयाचा नर आहे.

ठळक मुद्देलोखंडी फासात अडकला पायजखमी बिबट दवाखान्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: अचलपूर तालुक्यातील खैरी-दोनोडा गावाच्या खैरी शिवारात वन व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त कारवाईत एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. सदर बिबट तीन ते चार वर्षे वयाचा नर आहे. शिवशंकर त्रिकाळ यांच्या शेतातून शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास अमरावती वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याला पिंजऱ्यात घातले.बिबट्याचा मागच्या पायाला लोखंडी ट्रॅप अडकलेला होता. त्यासोबत त्या ट्रॅपला साखळी होती. या ट्रॅपमुळे त्याच्या मागच्या पायाला जखमही झाली आहे. शेतातील मक्याच्या पिकात तो शिरला. २५ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ८ दरम्यान शेताकडे गेलेल्या इसमास तो दिसला. त्याने ही माहिती गावकरी, पोलीस पाटीलसह आसेगाव पोलीस ठाणे आणि परतवाडा वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना दिली.माहिती मिळताच सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक शिवबाला आणि अमरावती प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, वनपाल डी.सी. लोखंडे, डी.बी. सोळंके, वनरक्षक नितीन अहिरराव, प्रशांत उमक, प्रदीप बाळापुरे, प्रवीण निर्मळ, धुमाळे, पी.के. वाटाणे, एस.जी. बरवट, आर.जी. गायकी, वाहनचालक मंगेश राऊत घटनास्थळी पिंजऱ्यासह दाखल झालेत. परतवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घटारे यांच्यासह अमरावती वनविभागाच्या रेस्क्यू टीमचे अमोल गावनेर, मनोज माहुलकर, सतीश उमक, मनोज ठाकूर, आसिफ पठाणही घटनास्थळी पोहोचलेत.आसेगाव पोलिसांच्या उपस्थितीत अमरावतीच्या रेस्क्यू टीमने त्या बिबट्यास ट्रँक्यूलायझर गनने बेशुद्ध केले. पायाचा ट्रॅप काढून जखमेवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार केलेत. बेशुद्धावस्थेत त्याला स्ट्रेचरवर घेतले गेले आणि पिंजऱ्यात ठेवले. यावेळी ५०० ते ६०० लोकांचा जमाव तेथे जमला होता.डोळ्यावर काळी पट्टीबिबट्याला बेशुद्ध केल्यानंतर लागलीच त्याचे डोळ्यावर काळी पट्टी बांधली गेली. ही पट्टी पिंजऱ्यातील त्या बिबट्याने खैरी ते परतवाडा प्रवासादरम्यानच डोळ्यावरून काढून फेकली.ट्रॅप लावला कुणी?घटनास्थळापासून काही अंतरावर एक पारधी बेडा आहे. या लोकांनी प्राण्यांना पकडण्याकरिता हा ट्रॅप लावला असावा. पण, चुकून त्यात बिबट अडकल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविला जात आहे. परतवाडा येथील वाघाच्या दवाखान्यात या बिबट्याला ठेवण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर त्यास एक तर त्याच्या नैसर्गिक अधिवासात किंवा प्राणी संग्रहालयात सोडण्यात येणार आहे.खैरी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. जेरबंद बिबट परतवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडावभाग, अमरावती

 

 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग