शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

शेतमजुरांवर बिबट्याचा हल्ला, चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 05:00 IST

नागपूर हायवेनजीनक संगमेश्वर रस्त्यावर दुचाकी शोरूमचे संचालक राजाभाऊ जाधव यांचे शेत आहे. नांदगाव पेठ येथील रमाकांत जयस्वाल यांनी ते सहा एकर शेत लागवणने केले आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता कापूस वेचणीकरिता मजूर शेतात आले होते. सर्व महिला मजूर कापूस वेचत असल्याने अचानक पऱ्हाटीमध्ये दबा धरून बसलेल्या महिलेवर हल्ला केला. आरडाओरड झाल्याने तो पळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतात कापूस वेचताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर अचानक हल्ला केला. यात दोन महिला,  सुमन नागवंशी (३०), चंद्रकला मरसकोल्हे (५०), शेतकरी विवेक जयस्वाल व वनविभागाचे वाहनचालक चंद्रकांत मानकर जखमी झाले. ही घटना नांदगाव पेठ शिवारात संगमेश्वर रस्त्याजवळील जाधव यांच्या शेतात बुधवारी सकाळी १०.३० दरम्यान घडली. या परिसरातील ही पहिलीच घटना असल्याचे हे शेत लागवणीने करणारे रमाकांत जयस्वाल म्हणाले. नागपूर हायवेनजीनक संगमेश्वर रस्त्यावर दुचाकी शोरूमचे संचालक राजाभाऊ जाधव यांचे शेत आहे. नांदगाव पेठ येथील रमाकांत जयस्वाल यांनी ते सहा एकर शेत लागवणने केले आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता कापूस वेचणीकरिता मजूर शेतात आले होते. सर्व महिला मजूर कापूस वेचत असल्याने अचानक पऱ्हाटीमध्ये दबा धरून बसलेल्या महिलेवर हल्ला केला. आरडाओरड झाल्याने तो पळाला. मात्र, भीती कायम राहिल्याने काहींनी गावातून आणून फटाके फोडले. वनविभागाला याची माहिती देण्यात आली. अवघ्या २० मिनिटात पोहरा चिरोडी बिटचे वनकर्मचारी ताफ्यासह दोन वाहन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेवढ्यात बिबट पुन्हा दृष्टीस पडला. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात शेतकरी एक वनकर्मचारी आणि शेतकरी विवेक रमाकांत जयस्वाल (३०) हे जखमी झाले. या प्रकाराने चवताळलेल्या बिबट्याला ट्रँक्यूलाईझ करण्यात आले. वनकर्मचाऱ्यांनी त्याला पिंजऱ्यात कैद केले नि वडाळी बिटमध्ये आणून ठेवले. वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाडे यांच्या मार्गदर्शनात कारवाई झाली.

अडीच वर्षांचा बिबट भरकटला?नांदगाव शिवारात आतापर्यंत बिबट आढळल्याचे ऐकिवात नाही. मात्र, अचानक ही घटना पहिल्यांदाच घडली. दोन ते अडीच वर्षांचा तो बिबट शिकार करण्याच्या नादात या परिसरात भरकटला असावा, असा कयास वनकर्मचाऱ्यांनी वर्तविला.

एकाचा इर्विनमध्ये उपचार सुरूनांदगाव पेठ येथील बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिला व युवक जखमी झाले. मात्र, महिलांना किरकोळ जखम असल्याने प्राथमिक उपचाराअंती सुटी देण्यात आली. विवेक जयस्वाल यांच्या दोन्ही हाताला, छातीवर व पाठीवर जखमा आहेत.

 

टॅग्स :leopardबिबट्या