शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत लेखणीबंद आंदोलन

By admin | Updated: May 30, 2014 23:20 IST

मार्च, एप्रिल व मे महिन्याचे कर्मचार्‍यांचे वेतन थकीत असल्याचा मुद्दा महापालिकेत पेटला. दरमहा नियमित वेतनासाठी शुक्रवारपासून कर्मचार्‍यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केल.

नियमित वेतनाचा मुद्दा : द्वारसभा घेऊन प्रशासनाचा निषेधअमरावती : मार्च, एप्रिल व मे महिन्याचे कर्मचार्‍यांचे वेतन थकीत असल्याचा मुद्दा महापालिकेत पेटला. दरमहा नियमित वेतनासाठी शुक्रवारपासून कर्मचार्‍यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केल. व्दारसभा घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदविला. महानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या मूलभूत सोयी सुविधांची जबाबदारी सांभाळणार्‍या महापालिकेवर स्वत: कर्मचार्‍यांच्या वेतनाची व्यवस्था कोठून करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने कर्मचार्‍यांना संपाचे हत्यार उपसण्याचा प्रसंग कसा निर्माण झाला, याचे चिंतन अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. स्थानिक संस्था कर(एलबीटी), मालमत्ता कर, बाजार परवाना विभागाचे उत्पन्न, सहायक संचालक नगररचना विभागातून येणार्‍या उत्पन्नावरच महापालिकेचा डोलारा चालतो. मात्र  या विभागातून येणारे उत्पन्न व कार्यरत कर्मचार्‍यांची कामाप्रती असलेली निष्ठा तपासून पाहणे हेसुध्दा आवश्यक झाले आहे. हल्ली  महापालिकेचा कारभार म्हणजे ‘आमदनी अठन्नी, खर्चा रूपय्या’ या म्हणीनुसार सुरू आहे. कोणतेही विकास कामे न करता प्रशासानाला दरमहा १0 कोटी रूपये केवळ कर्मचार्‍यांचे वेतन, साफसफाई खर्च, सेवानवृत्ती वेतन, पाणी पुरवठा, विद्युत देखभाल, नगरसेवक मानधन व वैकल्पिक वाहन  भत्ता, उद्यान निगा राखणे, टेलिफोन देयके आदी  वर खर्च करावा लागतो. उत्पन्न घसरल्याने नियोजन बिघडत चालल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.मात्र कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांना वेतन मिळालेच पाहिजे, ही न्यायीक मागणी पुढे रेटत महापालिका कर्मचारी कामगार संघाने संपाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाने नियमित वेतन देण्यासंदर्भात ठोस भूमिका घ्यावी नाही तर बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी दिला आहे. व्दारसभेत निषेध करताना प्रल्हाद कोतवाल, मंगेश वाटाणे, एम.जे. दंदे, आर. दिघडे, कमलाकर जोशी, प्रतिभा घंटेवार, सविता पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)