शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेवर अमेरिकेतील चर्चमध्ये व्याख्यान

By admin | Updated: October 28, 2015 00:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तेजस्वी कार्याने भारावलेले अमेरिकेचे 'बेस्ट सेलर' लेखक व मोटिव्हेश्नल स्पिकर विल हॅरीस यांनी ...

गजानन मोहोड  अमरावतीराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तेजस्वी कार्याने भारावलेले अमेरिकेचे 'बेस्ट सेलर' लेखक व मोटिव्हेश्नल स्पिकर विल हॅरीस यांनी अमेरिकेतील व्हर्जीनीया प्रांतातील सर्वात मोठ्या एनएसएसी फॉल या चर्चमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची वैश्विक भूमिका व ग्रामगीता यावर १ जून रोजी ३० मिनिटे व्याख्यान दिले. एनएसएसी फॉल हे चर्च अमेरिकेतील ख्रिश्चन धर्मियांचे सर्वात मोठे चर्च आहे. तेथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासुद्धा प्रार्थनेला जातात. तेथील व्याख्यानाचे प्रसारण अमेरिकेतील विल पॉवर रेडिओ या केंद्रावरुनसुद्धा करण्यात आले. राष्ट्रसंतांचे विचार हॅरीस यांच्या तोंडून ऐकून मंत्रमुग्ध झालेले उपस्थित धर्मगुरु व अमेरिकन नागरिक राष्ट्रसंतांच्या मौन श्रद्धांजलीदिनी येथे येणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनकार्यावर अमेरिकेत नामवंत लेखक विल हॅरीस लघुचित्रपट तयार करीत आहेत. हा लघुचित्रपट अमेरिकेतील फॉक्स, सिनबीसी व एबीसी या वाहिन्यांवर वर्षाच्या शेवटी प्रदर्शित करण्याचा त्यांचा मानस आहे. भर मे महिन्यात गुरुकुंजात केला मुक्काम!अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य व साहित्याचा अभ्यास करण्यासाठी विल हॅरीस यांनी मे महिन्यात गुरुकुंज आश्रम, राष्ट्रसंतांचे गुरू संत आडकोजी महाराज यांचे श्रीक्षेत्र वरखेड व राष्ट्रसंतांचे जन्मस्थान यावली येथे पंधरा दिवस घालविले. गुरुकुंज आश्रमातील दिनचर्येत त्यांनी सामुदायिक प्रार्थना व ध्यान अनुभवले. राष्ट्रसंतांबाबतची माहिती त्यांनी राष्ट्रसंतांसोबत जीवन घालविलेल्या वरखेड, यावली, चिमूर येथील सेवकांकडून तसेच राष्ट्रसंतांचे तत्कालीन सचिव जनार्दनपंत बोथे, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी व राष्ट्रसंतांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक रुपराव वाघ, अध्यात्म विभागप्रमुख राजाराम बोथे यांच्याकडून जाणून घेतली.कोण आहेत विल हॅरीस? विल हॅरीस हे अमेरिकेतील प्रख्यात लेखक असून त्यांचे 'विल पॉवर नाऊ' हे बेस्ट सेलर पुस्तक आहे. अमेरिकेतील ते प्रख्यात प्रेरक व्याख्याते म्हणून परिचित आहेत. त्यासाठी तासाला साडेतीन लक्ष रुपये आकारतात. बालविवाह रोखण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये उल्लेखनीय कार्य केले. 'विल पॉवर प्रायव्हेट लिमिटेड' कंपनी भारतात सामाजिक कार्यासाठी स्थापन केली.