शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत शुक्रवारी

By admin | Updated: October 5, 2016 00:20 IST

फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवार ७ आॅक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

उत्सुकता शिगेला : प्रभागरचनाही होणार जाहीरअमरावती : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवार ७ आॅक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्याचवेळी प्रभागरचनेचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येणार आहे.येथिल टाऊन हॉलमध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजता नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तत्पुर्वी मंगळवारी आयुक्त हेमंत पवार यांच्या नेतृत्वात टाऊन हॉलमध्ये बंदद्वार आरक्षण सोडतीची रंगित तालिम घेण्यात आली. ७ आॅक्टोबरलाच प्रभागरचना जाहिर होत असल्याने आजी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह इच्छूकांची उत्सूकता टांगणीला लागली आहे.महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभागपध्दतीने होत असल्याने प्रभागरचनेकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी आरक्षणासोबतच प्रभागरचना जाहीर होईल व त्यानंतरच राजकिय समीकरणांना वेग येणार आहे. आगामी महापालिका निवडणुक ीत ४३ प्रभागाएैवजी २२ प्रभाग राहणार आहेत. यातील २१ प्रभागातून प्रत्येकी चार आणि एका प्रभागातून तीन असे एकूण ८७ नगरसेवक निवडून येतिल.ही निवडणुक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीने होणार असल्याने अनेकांची समिकरणे बिघडली आहेत. त्यामुळे कुठला प्रभाग आणि कुठला पक्ष आपल्यासाठी सेफ राहिल,याची चाचपणी इच्छूकांनी चालविली आहे.शुक्रवारी २२ प्रभागाच्या सिमारेषा स्पष्ट झाल्यानंतर राजकिय वातावरण ढवळून निघणार आहे.बहुसदस्यीय प्रभागामध्ये कुठला प्रभाग आपल्यासाठी सेफ राहिल,याची चाचपणी सुरु झाली असली तरी शुक्रवारनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)तक्रारीचा सूरमुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत निघाल्यानंतर प्रभागरचनेवर आक्षेप घेण्यात आले. सत्ताधारी पक्षाने प्रभागाची मोडतोड केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अमरावतीतही असा प्रकार नाकारता येणार नाही,असे मत लोक मांडू लागले आहेत.२५ पर्यंत हरकती७ आॅक्टोबरला आरक्षणासह प्रभागरचनेचे प्रारुप प्रसिध्द होईल. यानंतर १० आॅक्टोबरला प्रारुप प्रभागरचनेची अधिसुचना राजपत्रात प्रसिध्द होईल. १० ते २५ आॅक्टोबर या कालावधीत प्रारुप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविण्यात येतील.