शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मिनीमंत्रालयासाठी आज सोडत

By admin | Updated: October 5, 2016 00:15 IST

फेब्रुवारी-मार्च २०१७ महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी...

राजकीय वर्तुळाचे लक्ष : झेडपी, पंसच्या गट-गणांच्या आरक्षणाची घोषणा अमरावती : फेब्रुवारी-मार्च २०१७ महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी गट आणि गणांची आरक्षण सोडत बुधवार ५ आॅक्टोेबर रोजी काढली जाणार आहे. जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या बचत भवनात तर पंचायत समित्यांची आरक्षण सोडत तहसील कार्यालयात काढली जाईल. जिल्ह्यात सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक झाली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणक्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती-जमाती, महिलांसाठी आरक्षित जागा व नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (महिला आरक्षणासह) राखून ठेवायच्या जागा आणि उर्वरित सर्वसाधारण संवर्गातील महिलांसाठी राखीव जागांचे आरक्षण या सोडतीमध्ये निश्चित केले जाणार आहे. जि.प.मध्ये वर्षानुवर्षे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे फेरबदलासाठी भाजप-शिवसेनेने कंबर कसली आहे. आघाडीला वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कस लावावा लागणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्याने कोणाचीही सत्ता आली तरी अध्यक्षपदी अनुसूचित जातीचा उमेदवार आरूढ होईल. जागा अशा राहणार राखीव झेडपीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी १२, अनुसूचित जातींसाठी ११ अशा २३ जागा राखीव राहणार आहेत. अनुसूचित जातींमध्ये प्रत्येकी ५ खुला प्रवर्ग आणि महिला तर अनुसूचित जमातींमध्ये प्रत्येकी ६ याप्रमाणे खुला प्रवर्ग आणि महिलांना संधी मिळणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण १६ जागा राखीव असून यात प्रत्येकी ८ जागा पुरूष-महिलांसाठी राखिव असतील, सर्वसाधारण प्रवर्गासाठी २० जागा राहणार असून प्रत्येकी दहा याप्रमाणे महिला आणि पुरूषांकरीता जागा राहणार आहेत. नेत्यांची राहणार मांदियाळीजिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी गट-गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्हा परिषदेसाठी बचतभवनात तर पंचायत समितीकरिता तहसील कार्यालयात सोडत काढली जाणार असल्याने इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. उत्सुकता शिगेला जि.प.,पं.सच्या गट व गणांच्या आरक्षण सोडतीचीसर्व राजकीय पक्षांना प्रतीक्षा लागली होती. अखेर त्यासाठी मुहूर्त जवळ आला आहे. त्यामुळे बुधवारी आरक्षण सोडतीकडे जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे.