शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

मालखेड, भानखेड परिसरात पट्टेदार वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:16 IST

धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन जणांसह दोन म्हैशी व कालवडीला ठार करणारा तो नरभक्षक वाघ मालखेड, भानखेडा परिसरात एका शेतकऱ्यांसह वाहनधारकांना सोमवारी दिसला. त्यामुळे परिसरातील नागरिंकांमध्ये त्या वाघाची दहशत पसरली आहे.

ठळक मुद्देदुचाकीने जाणाऱ्यांनो सावधान! : शेतकरी, शहरवासीयांना झाले दर्शन, गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन जणांसह दोन म्हैशी व कालवडीला ठार करणारा तो नरभक्षक वाघ मालखेड, भानखेडा परिसरात एका शेतकऱ्यांसह वाहनधारकांना सोमवारी दिसला. त्यामुळे परिसरातील नागरिंकांमध्ये त्या वाघाची दहशत पसरली आहे.तालुक्यातील मालखेड रेल्वे येथील शेतकरी पुंडलिकराव सुने हे सोमवारी सकाळी ९.४५ वाजता शेतात गेले असता, त्यांना एक पट्टेदार वाघ दिसला. सदर वाघ मालखेड परिसरात भ्रमण करीत असताना सायंकाळी ५.३५ वाजता चांदूर रेल्वेहून पोहरा, भानखेडमार्गे अमरावतीकडे निघालेल्या चांदूर रेल्वे येथील विनय कडू व स्वप्निल मानकर यांना भानखेड जंगल परिसरात दिसला. वाघ अचानक कारसमोर आल्याने त्यांना ब्रेक मारून जागेवरच वाहन थांबवावे लागले. त्यांनी अवघ्या १० ते १५ फुटांवरूनच पट्टेदार वाघ बघितल्याचे ते म्हणाले. त्यानंतर या वाघाने भानखेड येथील मातोश्री वृद्धाश्रमाकडे प्रस्थान केल्याचे सांगण्यात आले. त्यांनी गावातील लोकांना, रस्त्याने जाणाऱ्यांना सांगून सावधतेचा इशारा दिला. यासोबत आता या दुसऱ्या पट्टेदार वाघाच्या दर्शनाने तालुक्यातील नागरिकांच्या भीतीत अजून भर पडली आहे. यामुळे आता दुचाकीने प्रवास करणाºयांना सावध राहणे गरजेचे आहे. त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अंजनसिंगीपासून ३० किमी अंतर असलेल्या पोहरा, चिरोडी जंगलात तो वाघ येण्याची शक्यता पाहता वनविभागाने पोहरा, चिरोडी, माळेगाव, बडनेरा अशा सहा वनवर्तुळालगतच्या गावांना सतर्क राहण्याबाबत नोटीस दिली असून, वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविली आहे, असे वनाधिकारी आशिष कोकाटे म्हणाले.