शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी वसुलीला वेग येणार

By admin | Updated: April 23, 2015 00:01 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी पुढील आठवड्यात जोरदार कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.....

नोटीस बजावली : आयुक्तांच्या बैठकीनंतर ठरेल कारवाईची दिशाअमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी पुढील आठवड्यात जोरदार कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. एलबीटी दर फरकाची रक्कम भरण्यात यावी, याकरिता व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. कर भरण्याचा अवधी आठ दिवसाचा असून त्यानंतर ठोस कारवाई केली जाणार आहे.कापड, साखर, तेल, कच्च्या मालाची आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना २१ महिन्यांच्या एलबीटी फरकाची रक्कम भरण्याच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. या नोटीशींनी व्यावसायिक हतबल झाले आहेत. दुसरीकडे राज्य शासनाने केलेल्या घोषणेनुसार एलबीटी वसुलीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही, हे वास्तव आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांसाठी अभयदान योजना लागू करण्याची घोषणा केली. या योजनेत एलबीटी सक्तीने वसूल करता येणार नाही. तसेच दंडात्मक किंवा प्रतिष्ठानांना टाळे, बँक खाती सील करता येणार नाही, हे अपेक्षित आहे. मात्र शासनाने केवळ घोषणा केली. निर्णयाचे आदेशपत्र प्राप्त झाले नसल्याने प्रशासनाला एलबीटी वसूल केल्याशिवाय पर्याय नाही, असे चित्र आहे. यात केवळ व्यापारी संभ्रमावस्थेत असून एलबीटी भरला नाही तर महापालिका कारवाई करते. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी एलबीटीवरुन हात वर केल्याचे चित्र आहे. १ जुलै २०१२ ते १ एप्रिल २०१४ या दरम्यान एलबीटी फरकाची रक्कम वसूल करण्याची आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कृतिआराखडा तयार केला आहे. प्रारंभी ज्या व्यापाऱ्यांनी कराचा भरणा केला नाही त्यांना नोटीस देऊन अवगत केले जात आहे. निर्धारित कालावधीत एलबीटी भरला गेला नाही तर ती रक्कम कोणत्या नियमानुसार वसूल करावी, याचे नियोजनदेखील प्रशासनाने केले आहे. त्याकरीता केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. काही प्रतिष्ठांनानी विवरणपत्र सादर केले नसल्याने अशाविरुद्ध कारवाई प्रस्तावित आहे. एलबीटी विभागाला केवळ आयुक्त सुटीवरुन परत येण्याची प्रतीक्षा आहे. एलबीटी फरकाची रक्कम भरण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्यामुळे व्यावसायीक संघटना आमदार, खासदारांच्या पायऱ्या झिजवीत असल्याचे दिसून येते. एलबीटी कराची रक्कम वसूल करण्यासाठी सुमारे पाचशे व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.