शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

लक्ष्मी, कुबेर, नव्या केरसुणीची आज पूजा

By admin | Updated: November 11, 2015 00:18 IST

श्रीरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुध्दाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो प्रज्ज्वलित केलेले दिवे

मोहन राऊत अमरावतीश्रीरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुध्दाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो प्रज्ज्वलित केलेले दिवे अशा विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर व नव्या केरसुणीची पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे़ दिवाळी हा सण आश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीया या सहा दिवसांच्या कालावधीत हा सण साजरा करण्यात येतो़ बळी राजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता़ त्या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामनरूप धारण करून बळीराजाला तीन पायांत जमीन दान मागितले़ विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य व्यापून घेतले़ बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पातळाचे राज्य देऊन भू-लोकवासी त्याच्या आठवणी निमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील, असे आश्वासन दिले होते़ दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता़ यामुळे आनंद झालेल्या गोकुळवासीयांनी दुसऱ्या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता़ इ़स़ २५०० वर्षापूर्वी गौतम बुध्दाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती़ जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशी बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता़ महावीर सवंत त्यांच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते़ त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरूवात मानतात़ प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे़ लक्ष्मी आश्विन अमावस्येच्या रात्री सर्वच घरी संचार करून आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान या दिवशी शोधू लागते जिथे स्वच्छता, शोभा व रसिकता आढळते तिथे ती आकर्षित होते़ शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष संयमी व क्षमाशील पुरूष आणि गुणवत्ता व पतिव्रता स्त्रिया वास्तव्य करतात त्या घरी लक्ष्मीला जाणे आवडते, अशी आख्यायिका आहेत.लक्ष्मीपूजन करताना चौरंग अथवा पाट घेऊन त्यावर लाल, अथवा पिवळे वस्त्र टाकतात. त्यावर स्वस्तिक काढावे. त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. पूजेसाठी सोने, चांदी, नाणे, नोटा, नारळ, खोबरवाटी, खडीसाखर, बत्तासे, फळे, लवंगा, धने, साळीच्या लाह्या ठेवाव्यात ते़ घरात गाईची पाऊले, लक्ष्मीचे पाऊले काढल्यानंतर व सर्व प्रथम तेलाचा दिवा लावतात.