मुहूर्त साधला : शेतमाल विक्रीसाठी सुविधा अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केंद्र शासनाच्या पी.एस.एफ योजनेअंतर्गत शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ बाजार समितीचे उपसभापती किशोर चांगोले यांच्या हस्ते बुधवार करण्यात आला. केंद्र शासनाने खरीप हंगाम सन २०१६-१७ साठी एफ.ए. क्यु दर्जाच्या तुरीला ५ हजार ५० रूपये प्रती क्विंटल दर ४२५ रू पये बोनससह तुरीची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समिती करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे संचालक प्रशांत काळबांडे, प्रवीण भुगुल, प्रमोद इंगोले, बंडू वानखडे, प्रफुल्ल राऊत, मार्के टीच्या संचालिका पद्मा भडांगे, बाजार समितीचे सचिव बी.ए. डोईफोडे, खरेदी विक्रीचे मानद सचिव विक्रांत भुयार, राजेंद्र गायकी, गुणनियंत्रण अधिकारी यु. एस. डिकोले, हिमांशु पाटील, स्वप्निल तायवाडे, निलेश मिश्रा, संतोष धोटे, विजय चांगोले, किरण साबळे, पवन देशमुख यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता. शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणावी असे आवाहन उपसभापती किशोर चांगोले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ
By admin | Updated: December 29, 2016 01:47 IST