शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनाला प्रारंभ

By admin | Updated: September 8, 2014 00:54 IST

गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला असून रविवारी १२० मंडळांनी बाप्पांना निरोप दिला. यामध्ये शहरातील १८ व जिल्ह्यातील १०२ मंडळाचा समावेश होता.

अमरावती : गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला असून रविवारी १२० मंडळांनी बाप्पांना निरोप दिला. यामध्ये शहरातील १८ व जिल्ह्यातील १०२ मंडळाचा समावेश होता.यावर्षी शहरात ५१४ सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पांची स्थापना केली. यामध्ये ३६ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’चा समावेश आहे. ग्रामीण भागात ११६४ सार्वजनिक गणेश मंडळानी बाप्पांची स्थापना केली. त्यात १५५१ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ंचा समावेश आहे. भक्तांनी आनंदाने दहा दिवस गणेशोत्सव साजरा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देणे सुरु झाले आहे. विसर्जनादरम्यान शहरासह जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. छत्री तलाव व प्रथमेश तलाव येथे सावर्जनिक गणेश मंडळांच्या मुर्तीच्या विसर्जनाची सोय केली असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १४ सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जन होणार असून यामध्ये सोमवारी २१२, मंगळवारी १९०, गुरुवारी ७५, शुक्रवारी १६, शनिवारी ०२ व रविवारी एका मंडळांचा समावेश आहे. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून भक्तगण सर्वत्र बाप्पांना अखेरचा निरोप देत आहे. गणेश विसर्जनादरम्यान शांतता भंग न होता आनंदाने बाप्पाला निरोप देण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.सोमवारी सकाळी १०.४६ वाजता गणेश विसर्जनाचा मुहूर्तजिल्ह्यामध्ये २९ आॅगस्ट रोजी गणेशाची उत्साहात स्थापन करण्यात आली. आता गणेश स्थापनेला १० दिवस पूर्ण झाले असून गणेशाला निरोप देण्याची वेळ आली आहे. सोमवारी सकाळी १०.४६ वाजता गणेश विसर्जनाचा मुहूर्त असल्याचे पंडित नितीन हळवे यांनी सांगितले. रविवारी दुपारी २.२९ वाजतापासून अनंत चर्तुदशीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे रविवारपासूनच गणेश विसर्जनाला भाविकांनी सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी १०.४६ वाजताच्या मुहूर्ताची तिथी सुर्याने बघितलेली आहे. त्यामुळे सकाळी १०.४६ च्या मुहूर्तावर गणपती मूर्ती हलवून दिवसभरात कधीही गणेश विर्सजन करता येऊ शकते, असे हळवे गुरुजींनी सांगितले.