शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका खरकाडीपुरा शाळेत ई-लर्निंग प्रकल्पाचा शुभारंभ

By admin | Updated: September 1, 2014 23:15 IST

गरीब परिस्थितीतील मुला-मुलींना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मनपाच्या शाळासुद्धा खासगीच्या तुलनेत याव्यात व शाळांची पटसंख्या वाढावी, या उद्देशाने नवनवीन शिक्षण पद्धतीद्वारा अध्यापन करता यावे,

अमरावती : गरीब परिस्थितीतील मुला-मुलींना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मनपाच्या शाळासुद्धा खासगीच्या तुलनेत याव्यात व शाळांची पटसंख्या वाढावी, या उद्देशाने नवनवीन शिक्षण पद्धतीद्वारा अध्यापन करता यावे, याकरिता महापालिका शाळा क्र. ६ खरकाडीपुरा येथे आ. रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते ई-लर्निंग या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. आयुक्त अरूण डोंगरे यांच्या संकल्पनेतून मनपाच्या शाळांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर रोटरी क्लब आॅफ अमरावतीच्या मदतीने सुरू करण्यात येत आहे. खरकाडीपुरा हा गरीब वस्तीचा परिसर असून येथील मुलांमध्ये गुणवत्ता वाढावी व त्यांना संगणकीय ज्ञान अवगत व्हावे व आनंददायी शिक्षण मिळावे, या हेतूने या शाळेत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयुक्त अरूण डोंगरे, माजी महापौर विलास इंगोले, शिक्षण समिती सभापती हमीदाबी अफजल चौधरी, शिक्षण समिती उपसभापती अर्चना राजगुरे, नगरसेवक वसंतराव साऊरकर, नगरसेविका सुनीता भेले, उपायुक्त रमेश मवासी, शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी, शाळा निरीक्षक प्रवीण पाटील, चित्रा खोब्रागडे, मनोज भेले, अफजल चौधरी, गजानन राजगुरे उपस्थित होते. शिक्षण समिती सभापती यांनी सदर प्रकल्प सुरू केल्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले. अजूनही नवीन प्रकल्पाची सुरूवात करावी, अशी आशा व्यक्त केली. विलास इंगोले यांनी हे प्रकल्प विकास कामापेक्षाही मोठे आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांची प्रगती ही नक्कीच होणार आहे. ही शाळा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. मनपा आयुक्तांनी सदर प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर असून यशस्वी झाल्यास मनपाच्या प्रत्येक शाळेत राबविले जाईल. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करावी, पुढील वर्षी या शाळेला १०० वर्ष पूर्ण होत असल्यामुळे मनपा प्रशासनाकडून संगणक कक्ष निर्माण केले जाईल. आ. रावसाहेब शेखावत यांनी हे प्रकल्प सुरू केल्याबद्दल मनपा प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली व प्रकल्प कसा फायदेशीर आहे याचे महत्त्व पटवून दिले. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापिका अरूणा डांगे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रकल्पाद्वारे अध्यापन कसे केले जाईल यांचे प्रात्यक्षिक पाहुण्यांना करण्यात आले. प्रकल्पामध्ये विद्यार्थ्याच्या सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, आकाश गंगा, शरीराचे अवयव व कार्य, विज्ञानातील प्रयोग, दिवस रात्र अशा कठीण संकल्पना लवकरच स्पष्ट होण्यास निश्चितच मदत होणार आहे. संचालन कोपुल तर विजया खुळे यांनी केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते. (प्रतिनिधी)