शासनाकडे पाठविणार : आयुक्तांच्या सहापट कर आकारणीला विरोधअमरावती : विनापरवानगीचे बांधकाम अथवा कर आकारणी नसलेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण करुन अशा इमारतींना सहापट कर आकारणी करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. मात्र, या निर्णयाला आव्हान देत सर्वपक्षीय सदस्यांनी सहापट नव्हे तर दुप्पट कर आकारणी करण्याचा एकमताने ठराव मंजूर करुन तो शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सोमवारी घेतला. या ठरावामुळे लोकप्रतिनिधी विरुद्ध आयुक्त असा वाद उफाळण्याची दाट शक्यता आहे.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी महापालिका उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शहरातीेल मालमत्तांचे सर्वेक्षण तांत्रीकी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पाचही झोननिहाय सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनात कर निरिक्षक, लिपीक अशी चमू या विद्यार्थ्याच्या सोबतीला देण्यात आली होती.सभागृहाच्या ठरावानुसार पुनर्विचार करीत गरीब, सामान्य कुटुंबांना न्याय दिला जाईल. श्रीमंताना सोडणार नाही. कर चुकविणाऱ्या बदमाशांनादेखील सहापट कर भरावाच लागेल.- चंद्रकांत गुडेवार,आयुक्त, महापालिका.मालमत्तांचे कर मूल्यांकन न करण्याला नागरिक जबाबदार नाहीत. असेसमेंट केले नाही? याला कोण जबाबदार हे प्रशासनाने तपासावे. दुप्पट कर आकारणी नागरिक अदा करतील.- प्रवीण हरमकर,विरोधी पक्षनेता.सभागृहात सदस्यांनी मालमत्ता कर आकारणी दुप्पट करण्याचा ठराव घेतला आहे. त्यानुसार हा ठराव शासनाकडे पुढील निर्णयासाठी पाठविला जाईल. नागरिकांच्या हिताचा निर्णय झाला.- चरणजितकौर नंदा,महापौर, महापालिका.सहापट कर आकारणी ही नागरिकांवर अन्यायकारक बाब आहे. त्यामुळे सभागृहात नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा लागला. सदस्य म्हणून जनतेसाठी काम करणे हे प्रथम कर्तव्य आहे.- बबलू शेखावत,पक्षनेता, काँग्रेस.
-अखेर दुप्पट कर आकारणीचा ठराव मंजूर
By admin | Updated: July 21, 2015 00:07 IST