शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत अपघातात तीन चितळ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 22:33 IST

चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत चिरोडी वर्तुळातील पोहरा-चिरोडी मार्गावर शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षांचे मादी चितळ ठार झाले.

ठळक मुद्देचांदूररेल्वे मार्गावरील घटना : गतिरोधकासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव

आॅनलाईन लोकमतपोहरा बंदी : चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत चिरोडी वर्तुळातील पोहरा-चिरोडी मार्गावर शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षांचे मादी चितळ ठार झाले. गत दोन महिन्यांत आतापर्यंत तीन चितळ ठार झाल्याने वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका वाढला आहे.चांदूररेल्वे-अमरावती मार्गावर वनक्षेत्रातून रस्ता ओलांडताना या मार्गावर वनखंड ४१ क्रमांकाच्या वनक्षेत्र परिसरात दोन महिन्यांत एक नर, दोन मादी असे तीन चितळ आतापर्यंत ठार झाले आहेत. या वनक्षेत्रातून पाण्यासाठी भटकणाऱ्या चितळांच्या अपघाती मृत्यूच्या घटनांमुळे वनविभाग सजग झाला आहे. ही घटना घडताच चांदूररेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी घटनास्थळ गाठले. चिरोडीचे वनपाल एम.के. निर्मळ, वनरक्षक राजन हिवराळे यांनी पंचनामा करून चितळाचे शवविच्छेदन केले. वनक्षेत्रात मृत चितळाचा दफनविधी करण्यात आला असून, पशुवैद्यकीय अधिकारी घाटोळे यांनी शवविच्छेदन केले.चांदूर रेल्वे ते अमरावती मार्गावर एका महिन्यात तीन चितळांना अपघातात प्राण गमवावे लागले. देवनदी ते चिरोडी या एक किमीच्या अंतरावर वनविभागाने गतिरोधक प्रस्तावित केले आहे. चिरोडी या राखीव जंगलात वन्यपशूंची संख्या वाढीस लागली आहे. वन्यपशूंचा रस्ते अपघातापासून बचाव व्हावा, यासाठी वन्यक्षेत्रातील अमरावती-चांदूररेल्वे राज्य मार्गावर गतिरोधक निर्माण करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वनविभागाने सादर केलेला आहे. नवीन सावंगा फाटा, देवनदी, गोडने महाराज आश्रम, विठोबा सावंगा फाटानजीक रस्त्यावर गतिरोधक निर्माण करण्याची मागणी चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी केली आहे.राखीव जंगलात एका क्षेत्रातून दुसºया क्षेत्रात मुक्त विहार करताना वन्यपशूंना राज्य मार्ग ओलांडावा लागतो. हा मार्ग ओलांडताना वन्यपशूंचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राखीव जंगलात वन्यपशूंच्या मार्गावर गतिरोधक निर्माण करण्यासाठी बांधकाम विभागाला पत्र देऊन तसे कळविले आहे.चांदूररेल्वे राज्य मार्गावरच राखीव जंगल आहे. वन्यक्षेत्रातून जाणाºया रस्त्यावर गतिरोधक निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे कळविले आहे.- आशिष कोकाटे,वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदूररेल्वे