शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

-तर वाचली असती लाखभर संत्राझाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:32 IST

चारघड प्रकल्पात पाणी असूनही ते संत्राबागा आणि इतर पिकांसाठी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. पाणी सोडले असते, तर एक लाखाहून अधिक संत्र्याची झाडे वाचू शकली असती. याबाबत कुणीच लोकप्रतिनिधी अवाक्षरही काढत नसल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये रोष आहे. मतदारसंघाचे आमदार व विद्यमान कृषिमंत्र्यांची चुप्पी सर्वाधिक बोचरी ठरली आहे.

ठळक मुद्दे‘चारघड’चे पाणी मिळालेच नाही : अनिल बोंडे यांची चुप्पी; उत्पादकांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चारघड प्रकल्पात पाणी असूनही ते संत्राबागा आणि इतर पिकांसाठी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. पाणी सोडले असते, तर एक लाखाहून अधिक संत्र्याची झाडे वाचू शकली असती. याबाबत कुणीच लोकप्रतिनिधी अवाक्षरही काढत नसल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये रोष आहे. मतदारसंघाचे आमदार व विद्यमान कृषिमंत्र्यांची चुप्पी सर्वाधिक बोचरी ठरली आहे.सन २००६ मध्ये चारघड प्रकल्पावर असलेल्या गावांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष होता. डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन कालव्याचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि गोळीबार केला. यात एका तरुणाने प्राण गमावला. आता मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पावसामुळे भूजलस्तर खालावला. यामुळे मोर्शी तालुक्यातील खेड, उदखेड, लाडकी, खोपडा, बोडना आदी गावांमधील विहिरींचे पाणी आटले. पिण्याचेही पाणी उपलब्ध नसल्याचे पाहून चारघड धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी डॉ. बोंडे यांनी केली होती. दुसरीकडे यंदा तिवसा तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी अप्पर वर्धा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करताच त्याला डॉ. बोंडे यांनी प्रचंड विरोध दर्शवला. येत्या काही वर्षांमध्ये पाण्याचा संघर्ष तीव्र होत जाणार आहे. यात मात्र शेतकºयांचे मरण होणार असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात ना. अनिल बोंडे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.पाण्याच्या विषयावर राजकारण गैरचवर्धा नदीपात्र आटल्याने तिवसा शहराला दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला पाणी सोडण्याची मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे काही गावांना दिलासा मिळाला खरा; पण यातून झालेले राजकारण सर्वसामान्यांना भावले नसल्याचे रोखठोक मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केले.संत्रा वाळला; जबाबदार कोण?मुळात प्रश्न आहे तो पाण्याचा नियोजनाचा. डॉ. अनिल बोंडे हे कृषिमंत्री असल्याने त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आली आहे. त्यांच्याच मोर्शी मतदारसंघात पाण्याच्या नियोजनाअभावी चारघड धरणाच्या परिसरातील लाखांवर संत्र्याची झाडे वाळली. त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. चारघड धरणात पाणी असतानादेखील संत्र्याची झाडे जगवण्यासाठी ते का सोडण्यात आले नाही, असा सवाल नितीन देशमुख यांनी केला आहे.