शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
6
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
7
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
8
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
9
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
10
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
11
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

संत्रा झाडांच्या पानांवर अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:23 IST

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाºया वरूड तालुक्यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आता या वैभवाला आणि संत्राउत्पादकांच्या समृद्धीला ओहोटी लागली आहे. प्रथम आंबिया फळाची गळ आणि आता पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे संत्रा झाडांची रया गेली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाला केव्हा येणार जाग? : कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या समस्या संपता संपेना

लोकमत न्यूज नेटवर्कशेंदूरजनाघाट : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाºया वरूड तालुक्यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आता या वैभवाला आणि संत्राउत्पादकांच्या समृद्धीला ओहोटी लागली आहे. प्रथम आंबिया फळाची गळ आणि आता पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे संत्रा झाडांची रया गेली आहे. यावर उपाय सूचविण्याची विनवणी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाला होत आहे.यंदाच्या उन्हाळ्यात लाखो रुपये खर्च करून संत्रा झाडे व संत्रा फळे वाचविण्यासाठी शेंदूरजनाघाट परिसरातील संत्राउत्पादकांना प्रयत्न करावे लागले. ज्याच्याकडे पाणी होते, त्यांच्या संत्राझाडे व संत्राबागावरील फळे वाचली. मात्र, मोठ्या प्रमाणात पाण्याअभावी व अतिशय तापमानाने इतर शेतकºयांची संत्राफळे उन्हाळ्यातच गळली. खरिपाच्या पावसानेही दगा दिला. जूनच्या अखेरपर्यंत ४० अंश सेल्सिअस तापमान होते. भर पावसाच्या कालावधीत तापमान वाढत गेल्याने संत्राझाडे अक्षरश: वठली. पावसाने सुरुवात केली ती संथगतीने. त्यामुळे जमिनीत पाहिजे तसा ओलावा नसल्याने व जमिनीने बाष्प पकडल्याने झाडांची स्थिती दयनीय होती. पुढे पाऊस वाढला; मात्र दमदार नसल्याने जमिनीला पुरेसा ठरला नाही. परिणामी संत्राफळाला गळती लागली. त्यातच फळावरील फडक्या (फळ लटकणे) सुरू झाला. त्यानंतर देठातून संत्रे पिवळी होऊन मोठ्या प्रमाणात गळ सुरू झाली. फळगळीचे प्रमाण मोठे असून, महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही ही गळ आटोक्यात येत नसल्याने संत्रा उत्पादक चिंताग्रस्त झाला आहे.आता शेंदूरजनाघाट परिसरातील काही भागात पाने खाणाऱ्या अळीने संत्रा झाडांवर हल्ला चढविला आहे. मौजा खेडी परिसरात संत्रा झाडांवर व जमिनीवर प्रचंड प्रमाणात अळ्या दिसून येत आहेत. यामुळे झाडावरील पाने त्या अळ्या खात असून, या पाने खाणाऱ्या अळ्यांचे संत्रा झाडांवर शेंदूरजनाघाट परिसरातील काही भागात जास्त, तर काही भागात कमी असे असले तरी सर्वत्रच फवारणी करून आटोक्यात आणण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.जमिनीची उष्णता पूर्ण निघाली नाही. त्यातच सर्वदूर मुसळधार पाऊस असताना तालुक्यातील बराच भाग पावसापासून वंचित राहिला. केवळ हलक्या व बरड जमिनीतून पाणी जेमतेम राहिले, तर मध्यम व भारी जमिनीतील अजूनही पावसाची कमतरता असल्याने संत्राउत्पादक चिंतातुर झाला आहे. खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्यासोबतच संत्रा झाडांवरील पाने खाणाऱ्या अळ्या वाढतच असल्याने यावर उपाययोजना सुचवण्याकरिता कृषी विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे. संत्रा उत्पादन घेण्याºया शेंदूरजनाघाट, तिवसाघाट, रवाळा, सातनूर, पुसला, मालखेड, वाई, वरूड, धनोडी, मालखेड, जरूड, तिवसाघाट, पुसली, टेंभुरखेडा, हातुर्णा, गव्हाणकुंड परिसरात अंबीया बहाराची गळ सुरू असल्याने नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून निसटले आहे.संत्रा झाडावर पाने खाणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढवला. कृषी विभागाने संत्राउत्पादकांना १०० टक्के अनुदानावर फवारणी औषध द्यावे. याकरिता कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी तसे आदेश द्यावेत.- हर्षल फुटाणेसंत्रा उत्पादक, शेंदूरजनाघाटसंत्रा झाडांवरील फळाची गळ दिवसागणिक वाढतच असुन अळ्यांनीही हल्ला चढवला. कृषी विभागाने त्वरित दखल घेऊ न अनुदानावर फवारणी औषध उत्पादकांना त्वरित उपलब्ध करून द्यावे.- सतीश अकर्तेसंत्राउत्पादक, शेंदूरजनाघाट

टॅग्स :agricultureशेती